Beed : बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed : बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी

शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान  शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी   बीड जिल्ह्यात गेली चार ते पाच दिवसापासून मोठय

Beed : “आंधळं दळतं आणि कुत्र पिठ खातं” जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात रिपाईचे आंदोलन| LOK News24
Majalgaon : आझाद नगर येथील मूलभूत प्रश्नवार सलीम बापू आक्रमक (Video)
Beed : गेवराई मध्ये निघाला सर्वपक्षीय संताप मोर्चा (Video)

शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान 

शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी  

बीड जिल्ह्यात गेली चार ते पाच दिवसापासून मोठया प्रमाणात पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या  सोयाबीन ,कापूस ,तुर ,, आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी हातपम्प, व बोअर हे अक्षरशः भरून  वाहत आहेत .आनेकांच्या राहत्या घरात सुद्धा पाणीच पाणी झाले आहे .  त्यामुळे त्या ठिकाणचे पाणी उपसण्याचे काम चालू आहे .  बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्याने नदी नाले ओसांडून वाहत असून बऱ्याच ठिकाणच्या नदीवरील पुलावरून पाणी वाहत असून अनेक ठिकाणी नदीचे पात्र मोठे असल्याने त्या ठिकाणच्या पुलाचे काम होणे आवश्यक आहे.

मात्र या ठिकाणी संबधित प्रशासन याकडे गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असणे

त्यामुळे शासन , प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष  देऊन अतिवृष्टी झालेल्या सर्वच ठिकाणच्या शेतकऱ्यांना व ज्यांच्या घराची पडझड होऊन नुकसान झाले आहे , अशा  सर्वाना नुकसान भरपाई शासनाने तात्काळ देऊन मदत करावी अशी सर्व नागरिकांमधून मागणी होत आहे.

COMMENTS