येवला तालुक्यातील कातरणी येथील ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येवला तालुक्यातील कातरणी येथील ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप (Video)

दिनांक 25 सप्टेंबर  रोजी  येवला तालुक्यातील बहुचर्चित असलेली कातरणी ग्रामपंचायत येथील नवनिर्वाचित सदस्यांनी व सरपंचांनी ग्रामसेवक संजय

येवल्यातील महिलांनी गोमातेचे व वासराचे केले पूजन (Video)
Yeola : पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Video)
Yeola : येवला नगरपालिकेत विधी विषयक माहिती फलकाचे ऑनलाइन अनावरण (Video)

दिनांक 25 सप्टेंबर  रोजी  येवला तालुक्यातील बहुचर्चित असलेली कातरणी ग्रामपंचायत येथील नवनिर्वाचित सदस्यांनी व सरपंचांनी ग्रामसेवक संजय व्यवहारे यांच्यावर भ्रष्टाचार ,कामात अनियमितता ,तसेच ग्रामपंचायत निवडणुका होऊन साडे पाच महिन्यात एकही विकास काम सुरू न केल्याचा ठपका या या ग्रामसेवकाला ठेवण्यात आला तसेच मासिक मीटिंग संपल्यानंतर सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवक व्यवहारे यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून घेतले तसेच ग्रामपंचायत दप्तराचे काम घरी घेऊन न जाता कार्यालयातच पूर्ण करावे अशी मागणी देखील करण्यात आली

दरम्यान कतरणी गावचे उपसरपंच योगेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार घरपट्टी पाणीपट्टी तसेच बाजार लिलाव याचा हिशोब यामध्ये एका महिन्यात 15 हजार रुपयांची तफावत आढळून आली यामुळे सर्व सदस्यांनी मिळून ग्रामसेवक व्यवहार यांना कार्यालयात कुलूप लावून कोंडून ठेवले होते नांदगाव तालुक्यातील नागपूर येथून भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ग्रामसेवक संजय व्यवहारे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती

यानंतर येवला तालुक्यातील पारेगाव येथे मास्क आणि आणि सनीटायझर घोटाळ्याचा आरोप देखील व्यवहार यांच्यावर झाला होता या कारणाने देखील त्यांची बदली करण्यात आली होती

दरम्यान गटविकास अधिकारी डॉ उमेश देशमुख यांनी आता या प्रकरणी लक्ष घालून त्वरित ग्रामसेवक बदलून देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे

COMMENTS