खेड बुद्रुक येथे कोविड 19 लसीकरणाचा शुभारंभ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खेड बुद्रुक येथे कोविड 19 लसीकरणाचा शुभारंभ

खेड बुद्रुक, ता. खंडाळा येथे रविवार, दि. 11 एप्रिल रोजी कोविड 19 लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेची 2 कोटींची वसुली
बंधार्‍यावरील लोखंडी दरवाजांची चोरी
पत्नी, मुलगी, जावयासह शरद पवार उद्धव ठाकरेंच्या घरी गेले गणरायाच्या दर्शनाला

लोणंद / वार्ताहर : खेड बुद्रुक, ता. खंडाळा येथे रविवार, दि. 11 एप्रिल रोजी कोविड 19 लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. या लसीकरणाचा शुभारंभ हा खेड बुद्रुक गावचे सरपंच गणेश नामदेवराव धायगुडे-पाटील व डॉ. अमित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी केंद्रप्रमुख डी. बी. धायगुडे, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण नेवसे, तलाठी निशांत जोशी, एमपीडब्लू शिरवले दिलीप बाबूराव, आरोग्य सेविका अर्चना भुजबळ, पी. के. सोनवणे, आरोग्य सेविका पवार आर. एस., आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक संरक्षण समिती अध्यक्ष सुनिल रासकर, अंकुश धायगुडे, चेअरमन,

ग्रा. सदस्य विकास माने, ग्रा. सदस्य मोहन ठोंबरे, केदार दर्शने, सौरभ जोशी, सचिन चौधरी, राजेश ओव्हाळ, संजय धायगुडे, संदीप डोईफोडे तसेच कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 45 वर्षांपुढील व्यक्तींंना लसीकरण करण्यात येणार आहे, असे आवाहन सरपंच गणेश धायगुडे-पाटील यांनी केले होते. आज या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला असून लोकांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी एकूण 250 जणांना लस देण्यात आली. आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका,

शिक्षण विभागातील शिक्षक सर्व कर्मचारी या सर्वांचे आभार मानण्यात आले आहे.

COMMENTS