शेअर बाजारात तेजी… सेन्सेक्सने मारली मोठी उसळी…

Homeताज्या बातम्यादेश

शेअर बाजारात तेजी… सेन्सेक्सने मारली मोठी उसळी…

प्रतिनिधी : मुंबई जागतिक बाजारात चांगले संकेत मिळाल्याने आज (गुरुवारी) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली. सेन्सेक्स ४३०.८५ अंकांच्य

वारी मार्गवरील गावांचा आषाढी पायी वारीला विरोध
संगणक अभियंता ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात
दिव्यत्वाची प्रचिती, हीच माणुसकीची संस्कृती ः डॉ. बाबुराव उपाध्ये

प्रतिनिधी : मुंबई

जागतिक बाजारात चांगले संकेत मिळाल्याने आज (गुरुवारी) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली. सेन्सेक्स ४३०.८५ अंकांच्या वाढीसह ५९,३५८.१८ तर निफ्टी १२४.२ अंकांनी वाढून १७,६७०.८५ वर उघडला. 

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५३२ अंकांनी वाढून ५९,४५९ वर पोहचला. ट्रेडिंगदरम्यान बाजाराला मोठ्या स्टॉक अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व, एसबीआय, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल), एचडीएफसी बँक, इन्फोसिसमध्ये पाठिंबा मिळाला.

साप्ताहिक एफ अँड ओ कालबाह्य होण्याच्या दिवशी बाजारात तेजी आहे. प्रमुख समभागांबरोबरच मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही चांगली खरेदी सुरू आहे. 

बीएसई मिडकॅप निर्देशांक १.१८ टक्क्यांच्या वाढीने सुरू आहे, तर बीएसई मिडकॅप निर्देशांक १.२९ टक्क्यांनी वाढला आहे.

अवघ्या अर्ध्या तासाच्या व्यवसायात गुंतवणूकदारांची संपत्ती २.५० लाख कोटी रुपयांनी वाढली. बुधवारी बीएसई कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य २,५८,५६,५९६.२२ कोटी रुपये होते, ते २,५७,८७७.२१ कोटी रुपयांनी वाढून आज २,६१,१४,४७३.४३ कोटी रुपये झाले.

COMMENTS