धर्म संकटात! पण कुणामुळे?

Homeताज्या बातम्यादेश

धर्म संकटात! पण कुणामुळे?

हिंदू धर्म खतरे में अशी हाळी आणि हाकाटी भारतीय गेल्या कित्येक वर्षांपासून ऐकत आहोत.विशेषतः निवडणूकींचा हंगाम सुरू झाला की ही आरोळी हमखास दिली जाते,हि

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी सामूहिक प्रयत्नानांची गरज
आजचे राशीचक्र मंगळवार ,१२ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा
शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या  धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा : डॉ. प्रितेश जुनागडे


हिंदू धर्म खतरे में अशी हाळी आणि हाकाटी भारतीय गेल्या कित्येक वर्षांपासून ऐकत आहोत.विशेषतः निवडणूकींचा हंगाम सुरू झाला की ही आरोळी हमखास दिली जाते,हिंदू धर्म आणि हिंदूत्वाच्या नावावर मतांचे ध्रूवीकरण करण्यासाठी अन्य धर्मियांना  लक्ष्य करून अनेक वावड्या उठवल्या जातात.धर्माचे राजकारण करणाऱ्या मंडळींचे खरोखर धर्मावर दाखवले जाते तेव्हढे प्रेम आहे का? धर्माचे रक्षण व्हावे असे खरोखर या मंडळींना वाटते का? धर्म रक्षकांचा नक्की अजेंडा काय आहे? असे काही प्रश्न अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्या कथित आत्महत्येनंतर उपस्थित झाले आहेत. हीच घटना महाराष्ट्र किंवा अन्य भाजपेतर शासीत राज्यात घडली असती तर कोण कथीत धर्मवाद्यांनी कोण राडा केला असता? हा प्रश्नही आहेच.


हिंदू धर्माची मुख्य प्रचारकभुमी म्हणून ज्या प्रदेशाचा सातत्याने उल्लेख होतो, त्या उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला सुपीक जमीन तयार करण्याचे काम साधू संतांनी इमाने इतबारे केले आहे. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. हे राजकीय सत्य नजरेसमोर ठेवून अयोध्या स्थित रामजन्म भुमीचा मुद्दाही भारतीय जनता पक्षाने ऐरणीवर आणून सातत्याने लावून धरला. या मुद्याला अनुसरून भारतीय जनता पक्षाला साधु संत समाजाचा उत्स्फूर्त पाठींबाही मिळाला. भारतीय जनता पक्षाचा राजकारणाचा आत्मा म्हणूनच या साऱ्या घडामोडींकडे पाहीले जाते. एकूणच जिथं हिंदू,जिथं हिंदू धर्माची चर्चा तिथे भाजप अशी प्रतिमा तयार करण्यात भारतीय जनता पक्षाचे अध्वर्यू यशस्वी ठरले. त्याचा पुरेपूर राजकीय फायदाही उठवून अनेक राज्यांसह केंद्रातही सत्ता मिळवण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला. तथापी सत्तेवर आल्यानंतर भाजप वरवर दाखवतो तितका धर्म रक्षक आहे का? अशी शंका येण्याइतपत भाजपचा व्यवहार बदलला असल्याचा आरोप या पक्षावर होऊ लागला आहे.
हिंदू धर्म खतरे में अशी हाळी आणि हाकाटी भारतीय गेल्या कित्येक वर्षांपासून ऐकत आहोत. विशेषतः निवडणूकींचा हंगाम सुरू झाला की ही आरोळी हमखास दिली जाते, हिंदू धर्म आणि हिंदूत्वाच्या नावावर मतांचे ध्रूवीकरण करण्यासाठी अन्य धर्मियांना  लक्ष्य करून अनेक वावड्या उठवल्या जातात. धर्माचे राजकारण करणाऱ्या मंडळींचे खरोखर धर्मावर दाखवले जाते तेव्हढे प्रेम आहे का? धर्माचे रक्षण व्हावे असे खरोखर या मंडळींना वाटते का? धर्म रक्षकांचा नक्की अजेंडा काय आहे? असे काही प्रश्न अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्या कथित आत्महत्येनंतर उपस्थित झाले आहेत. हीच घटना महाराष्ट्र किंवा अन्य भाजपेतर शासीत राज्यात घडली असती तर कोण कथीत धर्मवाद्यांनी कोण राडा केला असता? हा प्रश्नही आहेच. आज केंद्रात आणि अनेक राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, त्या राज्यांमध्ये हिंदूत्व आणि हिंदू धर्माच्या रक्षणाची जबाबदारी सरकार आणि पक्ष म्हणूनही किती प्रामाणिकपणे पार पाडली जाते,या प्रश्नाला काही अपवाद वगळले तर नकारार्थीच उत्तर मिळते. हिंदू म्हणजे कोण आणि हिंदूत्व म्हणजे काय? या संकल्पनेच्या व्याख्या संदर्भानुसार बदलण्यात भाजप पटाईत झाला आहे. हिंदू धर्मातील उपेक्षीत वर्गाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही संकूचीत असल्याची अनेक उदाहरणे देता येतील. केवळ उपेक्षीतच नाही तर धर्म रक्षकांच्या बाबतीतही भाजप संधीसाधू राजकारण करतो हे पहायला मिळाले आहे. सध्या चर्चेत असलेली महंत नरेंद्र गीरी महाराजांची कथित आत्महत्या भाजपचे धर्म प्रेम चव्हाट्यावर आणण्यास पुरेशी आहे. केंद्रात आणि उत्तर प्रदेशातही सत्ता असलेल्या भाजपला एका जेष्ठ श्रेष्ठ महंतांच्या जीवाचे संरक्षण करता आले नाही. यातूनच या मंडळींचे धर्मप्रेम ,साधूसंतांविषयी असलेली आस्था ध्वनीत होते. महंतांच्या मृत्यूनंतर साधू समाजातून येऊ लागलेल्या संतप्त प्रतिक्रियांमधून अनेक रहस्य उलगडण्यास सुरूवात झाली आहे. मुळात तमाम साधू समाज ही आत्महत्या आहे मान्य करायलाच तयार नाही. ही हत्याच आहे असा दावा साधू समाजातून केला जात आहे. राज्यात आणि केंद्रातही धर्मरक्षक सत्तेवर,राज्यात योगी मुख्यमंत्री असतानाही धर्मश्रेष्ठ महंतांना आत्महत्या करण्याची वेळ येत असेल किंवा साधू समाज म्हणतो त्या प्रमाणे हत्या होत असेल तर सत्तेवर असलेल्या कथित धर्मरक्षकांसाठी नामुष्की म्हणावी लागेल. मुळात या घटनेला स्थावर मालमत्तेच्या वादातून निर्माण झालेले मतभेद कारणीभूत असल्याची चर्चा आहे. काही हजार कोटींची मालमत्ता या घटनेला कारणीभूत ठरली आहे. सुरू असलेल्या चर्चेतून मठ,आश्रम,बाबा,महंत,साधू यांची संपत्तीही चर्चेत आली असून हा समाज योगी की भोगी असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. साधू म्हटले की,त्याग,समर्पण,संन्यास ही प्रणाली नजरेसमोर येते. परंपराही तीच राहीली आहे. आजही एका वर्गात कपल्लक साधूंची मोठी मांदीयाळी धर्मात सक्रीय आहे. कुठे झोपतात कुठे खातात कुठलाच थांगपत्ता नाही. मोह मायेपासून कोसो दुर असलेला हा वर्ग एका बाजूला आणि हजारो कोटींची संपत्ती बाळगणारे आश्रमधारी वर्ग दुसऱ्या बाजूला. आणि हाच दुसरा  वर्ग नेहमीच वादग्रस्त ठरून चर्चेत राहीला आहे. वाद विवाद याच वर्गाबाबत मोठ्या प्रमाणात होतांना दिसतो आहे. मग धर्म संकटात आहे,अशी हाकाटी पिटून राजकारण करणाऱ्या मंडळींनीच धर्म संकटात असेल तर कुणामुळे? या प्रश्नाचे उत्तर देण्याचे दायीत्व स्वीकारायला हवे. आणि हो भक्तांसाठी एक खास प्रश्न आहे,हीच घटना महाराष्ट्रात अथवा भाजपची सत्ता नसलेल्या कुठल्याही राज्यात घडली असती तर? पालघर जिल्ह्यात झालेल्या त्या दोन कथित साधूंच्या हत्येनंतर या मंडळींनी माजवलेले रान आठवत असेल तर उत्तरप्रदेशातील या घटनेनंतर साऱ्या भक्तांची दातखीळ बसली का?

COMMENTS