Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरचे आ. संग्राम जगतापांविरोधात न्यायालयात खासगी दावा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम (MLA sangram jagtap) जगताप यांच्याविरोधात येथील जिल्हा न्यायालयात निर्भय नवजीवन फाउंडे

बुऱ्हानगर मंदिरातील भगत पुजारी फैलावतात कोरोनाचा प्रादुर्भाव बुऱ्हानगर ग्रामस्थांचा आरोप
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काँग्रेस पक्ष सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी – ना. बाळासाहेब थोरात
संत भगवान बाबांचे विचार समाजाला प्रेरणादायी – आ. संग्राम जगताप

अहमदनगर/प्रतिनिधी-

नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम (MLA sangram jagtap) जगताप यांच्याविरोधात येथील जिल्हा न्यायालयात निर्भय नवजीवन फाउंडेशनचे प्रमुख संदीप भांबरकर यांनी खासगी दावा दाखल केला आहे. त्याची प्राथमिक सुनावणी गुरुवारी (23 सप्टेंबर) होणार आहे. विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यातून आयटी पार्कचे खोटे आश्‍वासन दिल्याने आ. जगतापांविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी भांबरकर या दाव्याद्वारे न्यायालयासमोर केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनीही, आयटी पार्कद्वारे रोजगार देण्याचा दावा करून आ. जगताप यांनी नगरकरांची फसवणूक केल्याचा आरोप मध्यंतरी केला होता. या पार्श्‍वभूमीवर आता भांबरकर यांनी न्यायालयात दाखल केलेल्या खासगी दाव्यात काय होते, याची उत्सुकता नगरमध्ये व्यक्त होत आहे. http://epaper.lokmanthan.com/
नगर विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात मतदारांना खोटे आश्‍वासन देऊन व दिशाभूल करून अहमदनगर एमआयडीसी येथील आयटी पार्क कार्यान्वीत केल्याचे सांगणारे आमदार संग्राम जगताप यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्यासाठी नगर जिल्हा न्यायालयात खासगी दावा दाखल केला आहे. या अर्जावर गुरुवार दि.23 सप्टेंबर रोजी प्रथम सुनावणी होणार असल्याची माहिती भांबरकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. खोटे आश्‍वासन दिल्याबद्दल जिल्हा न्यायालयात पुराव्यानिशी हा खासगी दावा दाखल केला असून, मुख्य निवडणूक आयोगाकडेही तक्रार केल्याचे भांबरकर यांनी सांगितले.
या खासगी दाव्याबाबत माहिती देताना भांबरकर म्हणाले की, माहिती अधिकारात एमआयडीसी कार्यालयाकडे आयटी पार्कची माहिती घेतली असता, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी (मुंबई) यांच्या 26 ऑक्टोबर 2016 या परिपत्रकान्वये नगर औद्योगिक क्षेत्रातून आयटी पार्क वगळण्यात आला आहे. तर ती जागा इतर उद्योजकांना भाडे तत्वावर देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून आमदारांनी स्वयंघोषित आयटी पार्क उभे करून मतदारांची जाहीरनाम्याद्वारे दिशाभूल केली असल्याचा आरोप भांबरकर यांनी केला आहे.
ते म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निवडणूक लढवली. त्यांनी जाहीरनाम्यामध्ये आयटीपार्क सुरु केला असल्याचे दर्शवले व युवक-युवतींना आयटी पार्कमध्ये रोजगार उपलब्ध करून दिल्याचे जाहीर केले. काही तरुण-तरुणींनी, व्हिडिओद्वारे आयटी पार्क चालू झाला असून, आम्हाला रोजगार मिळाल्याचे सांगितले. त्यामुळे, आयटी पार्कबद्दल माहिती घेतली असता शहरात आयटी पार्कच नसल्याचे निदर्शनास आले. माहिती अधिकार 2005 अन्वये एमआयडीसी कार्यालयाकडे आयटी पार्कविषयी माहिती मागितली असता, त्यामध्ये एमआयडीसी कार्यालयाला आपल्या मार्फत परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती 10 ऑगस्ट रोजी मिळाली. त्यामध्ये एमआयडीसी कार्यालयाचे असे म्हणणे आहे की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सहमुख्य कार्यकारी अधिकारी (मुंबई) यांचे परिपत्रक 26 ऑक्टोंबर 2016 अन्वये अहमदनगर औद्योगिक क्षेत्रामधील आयटी पार्क वगळण्यात आला आहे. या आयटी पार्कची जागा इतर उद्योजकांना भाडेतत्वावर देण्यात आली आहे. या पत्रावरून आमदार जगताप यांनी सर्व मतदार व नागरिकांची दिशाभूल केली असल्याचे भांबरकर यांचे म्हणणे आहे.
आमदार जगताप यांनी जाहीरनाम्याच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमीष दाखवून तसेच निवडणूक प्रचारात आयटी पार्क चालू केला आहे असे खोटे सांगितले आहे, असा दावा करून भांबरकर म्हणाले, निवडणूक प्रचारादरम्यान व्हिडिओद्वारे नोकरी मिळाली असे सांगणारे युवक-युवती यांनीदेखील फसवणूक केली असल्याचे भांवरकर यांचे म्हणणे आहे. यावरून आमदार व खोटी माहिती सांगणारे युवक-युवतींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गुन्हा दाखल करून घेण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देण्यात आला होता. मात्र पोलीस स्टेशनने हा अर्ज स्वीकारला नाही. यानंतर पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज देण्यात आला. त्यावर कारवाई झाली नसल्याने जिल्हा न्यायालयात खासगी दावा दाखल करण्यात आला आहे. यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे, असे भांबरकर म्हणाले.

COMMENTS