अंगणवाडी सेविकांनी मोबाईल केले जमा (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांनी मोबाईल केले जमा (Video)

  पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत सन 2019 मध्ये राज्यातील एक लाख पाच हजार 592 अंगणवाडीसेविकांना शासकीय कामासाठी मोबाईल वाटप करण्यात आले होते .सदर मोबाईल

solapur : वाळू चोरीला लगाम घालू ; पोलिस महानिरीक्षक (Video)
Solapur : मंद्रुप महावितरणचा भोंगळ कारभार (Video)
Solapur : वाळू तस्कराने चिरडलेल्या पोलिसावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…

  पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत सन 2019 मध्ये राज्यातील एक लाख पाच हजार 592 अंगणवाडीसेविकांना शासकीय कामासाठी मोबाईल वाटप करण्यात आले होते .सदर मोबाईलची वॉरंटी दोन वर्ष कालावधीचे असून तो कालावधी मे 2021 मध्ये संपला आहे सदर मोबाईल टू जीबी रॅम चा आहे. मोबाईल मध्ये लाभार्थ्यांची नावे हजेरी वजन-उंची स्तनदा व गर्भवती मातांची माहिती पोषण आहाराचे वाटप. इत्यादी सविस्तर माहिती भरण्यात येते. मोबाईलची क्षमता कमी असल्यामुळे व त्यात भरावयाची माहिती जास्त असल्यामुळे हे मोबाईल हँग होतात . व त्या मोबाईल वर काम करणे कठीण होते.  यामुळे अंगणवाडी सेविकांनी पंचायत समिती बालविकास अधिकारी यांच्याकडे मोबाईल  जमा.  केले यावेळी सुर्यमणी गायकवाड, अनिता सावळकर,सुजाता गाडगीळ,ऊर्मिला थोरात व सर्व बीट प्रमुख उपस्थित होते.

COMMENTS