Homeताज्या बातम्याअहमदनगर

खरवंडी कासार परिसरातील विविध प्रश्नाबाबत आंदोलन करणार – अंकुश कासुळे

खरवंडी कासार प्रतिनिधी/ भालगाव चे माजी सरपंच अंकुश कासुळे यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत उकंडा फाटा येथे २३/०९/२०२१ रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिल

महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात नगर जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या खेळाचा दबदबा कायम राखला -आ.अरुणकाका जगताप
सौरऊर्जा पथदिवे काळाची गरज : मा. नगरसेवक अजिंक्य बोरकर
छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेच्या बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन


खरवंडी कासार प्रतिनिधी/

भालगाव चे माजी सरपंच अंकुश कासुळे यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत उकंडा फाटा येथे २३/०९/२०२१ रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहेटाकळीमानुर परिसरातील अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे नुकसानीबाबत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुसकान भरपाई मिळावी मागील वर्षी अतिवृष्टी होऊ नये काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तसेच खरवंडी लोहा राष्ट्रीय महामार्गाचे काम एकदम धीम्या गतीने चालू आहे तसेच त्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे ठिकठिकाणी गटार नसल्यामुळे शेतीमालाचे सैद गटार नसल्यामुळे शेत जमीन व शेतीचे मालाचे नुकसान झाले आहे त्यांना शेतकऱ्यांना भरपाई मिळावी तसेच रस्त्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा तसेच वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वीज पुरवठा खंडीत आहे तसेच हवे पासून शंभर फूट रस्ता कॉंक्रिटीकरण करून द्यावा त्याचप्रमाणे ७५१ रस्त्याच्या लगत साईड गटार बांधून घ्यावे व शेतकऱ्यांना शेती मध्ये जाण्याकरता रस्ता करून द्यावा त्याचप्रमाणे पैठण पालखी रोड ७५१ मधील शेतकऱ्यांना आधार मावेजा मिळाला नाही ते अदा करण्यात यावे त्याचप्रमाणे नगर लोहा 361 रस्त्याच्या लगत साईड गटार बांधून घ्यावे व शेतकऱ्यांना घरी जाण्याचा रस्ता करून द्यावा त्याचप्रमाणे गेली तीन वर्ष अतिवृष्टी झाल्यामुळे आम्हा शेतकऱ्यास विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना एकही रुपया दिलेला नाही तेव्हा नुकसान झालेल्या पिकांचा पिक विमा कंपनीकडून विमा रक्कम मिळवून द्यावी तसेच सातबारा ऑनलाइन पिक पेरा लावण्यासाठी शासनाने शेतकऱ्यास ऑनलाइन करणे बाबत कळविले आहे परंतु 90% शेतकरी अडाणी आहेत तसेच शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाईल नाही इंटरनेट बाबत माहिती नाही त्यामुळे यांना तेरा ऑनलाईन करता येत नाही तेव्हा शासनाने कामगार तलाठी यांनाच पूर्वीप्रमाणे सातबारा ऑनलाइन करण्यात यावा तरी माननीय तहसीलदार साहेब आमच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात नसता आम्ही लोकशाही मार्गाने २३/०९/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता उकंडा फाटा भालगाव येथे रस्ता रोको आंदोलन करणार आहोत असा इशारा भालगाव चे  माजी सरपंच अंकुश कळसे यांनी दिला आहे

ReplyForward

COMMENTS