Homeताज्या बातम्या

’धन्यवाद मोदीजी’ अभियानातून युवकांपर्यंत केंद्राच्या योजनांची माहिती; राजकीय संदेशालाही धार

नांदेड: भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने विद्यार्थी आणि युवकांसाठी राबविलेल्या विविध योजना

साहित्यिक रुचिरा बेटकर यांना ‘डॉ. अण्णा भाऊ साठे गौरव पुरस्कार’; १ ऑगस्ट रोजी नांदेड येथे वितरण
शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे रुग्णालयात दाखल, आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
नांदेड शहरातील डी-मार्ट रोडवरील झाडांची विनापरवाना कत्तल? जाहिरात फलकांसाठी हरित संपदेवर घाला; कारवाईची मागणी
PM मोदी ने जी-20 की अध्यक्षता पर शुभकामनाओं के लिए दिया धन्यवाद, बोले-  मिलकर करेंगे काम, India News in Hindi - Hindustan

नांदेड: भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने विद्यार्थी आणि युवकांसाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ’धन्यवाद मोदीजी’ या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा प्रमुख कार्यक्रम २७ जुलै रोजी मुंबई येथे होणार असून, राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.

या अभियानाअंतर्गत प्रदर्शन फलक, माहितीपर बॅनर्स आणि जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराशी संबंधित योजनांची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० (NEP), मल्टिपल एन्ट्री-एक्झिट प्रणाली, पीएम श्री शाळा, पीएम ई-विद्या, दीक्षा पोर्टल, प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना, प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना, स्किल इंडिया अभियान, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY), तसेच IIT, IIM आणि AIIMS संस्थांच्या विस्ताराची माहिती प्रदर्शनात मांडली जाणार आहे. यासोबतच परदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी राबविण्यात आलेल्या ’ऑपरेशन गंगा’ मोहिमेचाही यात विशेष समावेश असेल.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि सक्षमीकरणाला प्राधान्य दिले आहे. भारताची युवा शक्ती ही देशाची सर्वात मोठी ताकद असून, काही विरोधी शक्ती खोट्या प्रचारातून युवकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, विकासकामांची वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडणे ही भाजपची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी, भारतीय जनता युवा मोर्चा, महिला मोर्चा, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

COMMENTS