Homeताज्या बातम्या

अवैध मुरूम उत्खनन तात्काळ बंद करा; ’स्पॉट’ पंचनामा करून कारवाईची मनसेची मागणीइमामपूर, पालवन, ढेकणमोहा, चराटा परिसरातील उत्खननाविरोधात सोमेश्वर कदम आक्रमक; आंदोलनाचा इशारा

बीड शहरालगत असलेला डोंगर भाग पोखरून मुरूम माफी यांनी डोंगराची चाळण केल्याचे विदारक चित्र सध्या बीड शहराच्या आसपास पहावयास मिळत आहे याकडे महसूल प्

शेवगावात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईस्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकार्‍यांकडे;महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय
अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच : महसूल मंत्री बावनकुळे



बीड शहरालगत असलेला डोंगर भाग पोखरून मुरूम माफी यांनी डोंगराची चाळण केल्याचे विदारक चित्र सध्या बीड शहराच्या आसपास पहावयास मिळत आहे याकडे महसूल प्रशासन व पोलीस यांनी वेळेचं मुरूम माफीयांना आवर घालण्याची गरज आहे.
बीड शहरालगतच्या इमामपूर, ढेकणमोहा,वायबटवाडी कोल्हारवाडी, पालवण व चराटा परिसरात सुरू असलेल्या विनापरवाना अवैध मुरूम उत्खननाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेचे जिल्हासचिव सोमेश्वर राजकुमार कदम यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत अवैध मुरूम उत्खनन तात्काळ बंद करून संबंधित मुरूम माफियावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुरूम माफियांनी हायवा वाहनावरील क्रमांक पुसण्यात आले आहेत यामुळे एखादा अपघात, जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण?त्या वाहनाचा तपास करण्यास पोलिसांना अनंत अडचणी देखील येत असल्याची उदाहरणे आहेत. स्थानिक पोलीस त्या मुरूम माफियाकडून चिरीमिरी घेत असल्याची देखील चर्चा आहे.  निवेदनात यापूर्वीही इमामपूर परिसरातील अवैध उत्खननाबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही मोठ्या प्रमाणावर पोकलेनने मुरूम उत्खनन व टिप्परने राजरोसपणे मुरूम वाहतूक सुरू असल्याचे दिसत आहे. या अवैध उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असून शासनाच्या तिजोरीवर थेट दरोडा टाकला जात असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. मनसेचे जिल्हा सचिव यांनी असा आरोप केला आहे की, मुरूम माफियांनी डोंगरभागाची अक्षरशः चाळणी केली असून त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. भविष्यात या भागात भूस्खलनासारखे गंभीर धोके निर्माण होऊ शकतात, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अवैध उत्खनन तातडीने थांबवावे, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, गेवराई तालुक्यात जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार वाळू माफियांवर ज्या प्रकारे धडक कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर आता मुरूम माफियांवरही कारवाई होणार का, असा सवालही मनसेने उपस्थित केला आहे. प्रशासनाने पुन्हा दुर्लक्ष केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यास प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

COMMENTS