बीड: अनुसूचित जातीमधील एकूणसाठ जातींच्या संघटित शक्तीचे विभाजन करून चळवळ कमकुवत करण्यासाठी आरक्षणात उपवर्गीकरण लागू करण्यासाठी सुरू असलेले षडयंत्
बीड: अनुसूचित जातीमधील एकूणसाठ जातींच्या संघटित शक्तीचे विभाजन करून चळवळ कमकुवत करण्यासाठी आरक्षणात उपवर्गीकरण लागू करण्यासाठी सुरू असलेले षडयंत्र हाणून पाडण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशावरून आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपाइंच्या वतीने राज्यासह बीड जिल्ह्यात तीव्र आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या अनुषंगाने युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ठीक ११ वाजता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती आरक्षणामध्ये ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणाचा मुद्दा समोर ठेवून आपल्या राजकीय फायद्यासाठी ५९ जातींमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र राज्यभर राबविण्यात येत आहे. आगामी काळात आरक्षणाने मिळालेले हक्क अबाधित ठेवण्यासाठी व अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी सोमवार दि. २७ जुलै २०२६ रोजी बीड जिल्ह्यासह बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित तीव्र आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी रिपाइंच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस राजू जोगदंड, किसन तांगडे, शाहू डोळस, महादेव बनसोडे, बापू पवार, अविनाश जोगदंड, महेश आठवले, सुभाष तांगडे, सतीश शिनगारे, संभाजी गायकवाड, विलास जोगदंड, शाम वीर, प्रा. बाळासाहेब गव्हाणे, भैय्या मस्के, पप्पू वाघमारे, आप्पा मिसळे, अक्षय कोकाटे, दयानंद उजगरे, नामदेव वाघमारे, भास्कर जावळे, भीमराव घोडेराव, भैया वाघमारे, सोनू वडमारे, दीपक कांबळे, सनी जोगदंड, भाऊसाहेब कांबळे, के. के. कांबळे, गौतम कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS