Homeताज्या बातम्या

वसंतदादा पाटील महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी

पाटोदा: येथील नवगण शिक्षण संस्था, राजुरी (न.) संचलित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नवगण महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न
सौ. के. एस. के. महाविद्यालयात स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी; सामाजिक व शैक्षणिक कार्याला अभिवादन
सौ. के. एस. के. महाविद्यालयात स्व.अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

पाटोदा: येथील नवगण शिक्षण संस्था, राजुरी (न.) संचलित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बळीराम राख होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. अभय क्षीरसागर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अनिल जोगदंड, पदव्युत्तर विभागाचे संचालक प्रा. डॉ. गणेश पाचकोरे तसेच पर्यवेक्षक प्रा. दयानंद सरपते यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सोमनाथ लांडगे यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेतला. यानंतर सहकार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. महादेव काळे यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य टिळक यांच्या राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक कार्याचा सविस्तर उहापोह केला. त्यांनी ’केसरी’ आणि ’मराठा’ या वृत्तपत्रांद्वारे समाजजागृती करून स्वातंत्र्य चळवळीत लोकमान्य टिळक यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे सांगितले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. बळीराम राख यांनी लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील जहाल नेते होते, असे सांगत “ब्रिटिशांचे डोके ठिकाणावर आहे काय?” या त्यांच्या प्रभावी लेखाचा उल्लेख करून ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात जनजागृती करण्यातील त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रज्ञा महेशमाळकर यांनी केले, तर डॉ. जालिंदर लोणके यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. विनोद उगले, डॉ. पुष्पा जाधव, प्रा. आशुतोष चोरमले, प्रा. चक्रधर सानप आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS