वेब टीम : चंडीगढपंजाब काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला. राजीनामा देण्यासाठी अमरिंदर सिंह यां
वेब टीम : चंडीगढ
पंजाब काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला. राजीनामा देण्यासाठी अमरिंदर सिंह यांच्यासोबत २० आमदार आणि पंजाबचे काँग्रेसचे काही खासदार राजभवनला गेले होते.
कॅप्टन अमरिंदर सिंह हे काँग्रेसच्या हायकमांडवर नाराज आहेत. आगामी काळात काँग्रेसला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर संध्याकाळी कांग्रेस आमदारांची बैठक होणार आहे.
त्यात नव्या विधिमंडळ नेत्याची निवड होईल. मुख्यमंत्रिपदावरुन राजीनामा दिल्यानंतर कॅप्टम अमरिंदर सिंह काँग्रेसही सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, पंजाबमध्ये वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ‘अपमान सहन करणार नाही’ असे म्हटले आहे. त्यामुळे राजीनाम्यानंतर अमरिंदर सिंह काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सोनिया गांधी यांना फोन करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्यांना विश्वासात न घेता काँग्रेस आमदारांची बैठक बोलवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मला पक्षात अपमानास्पद वागणूक दिली जात असेल तर मुख्यमंत्री राहण्याची इच्छा नाही असे अमरिंदर सिंह म्हणालेत.
COMMENTS