Homeताज्या बातम्या

प्रकृतीच्या चर्चांदरम्यान सलमान खानची पोस्ट व्हायरल; ‘आप लोगों की तबीयत कैसी है?’ म्हणत चाहत्यांना विचारला प्रश्न

मुंबई : बॉलिवूडचा 'दबंग' स्टार सलमान खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये सलमान पूर

बिग बॉसच्या घरात राडा
बिग बॉस लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
सलमान खान ची भाची बाॅलिवूडमध्ये करणार पदार्पण

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ स्टार सलमान खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये सलमान पूर्वीपेक्षा बारीक दिसत असल्याने त्याच्या प्रकृतीबाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चांदरम्यान सलमानने सोशल मीडियावर नवी पोस्ट शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.अलीकडेच सलमान खान मुंबईतील स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी (SRA) च्या एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमातील त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्याच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली होती.या चर्चांनंतर सलमान खानने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ब्लॅक-अँड-व्हाईट छायाचित्रांची मालिका शेअर केली. काऊबॉय स्टाईलमधील विविध हॅट्स परिधान केलेल्या या फोटोंमध्ये सलमान फिट आणि सडपातळ दिसत असून, हलकी दाढी आणि गंभीर लूकमध्ये तो चाहत्यांना पाहायला मिळाला.फोटो शेअर करत सलमानने “आप लोगों की तबीयत कैसी है?” असे हटके कॅप्शन दिले. या एका ओळीमुळे त्याच्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर अप्रत्यक्ष उत्तर दिल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

सलमानच्या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने, “सगळं ठीक आहे भाऊ… पण तुम्ही भ्रष्टाचार आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही बोलायला हवं,” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या एका चाहत्याने, “तुम्ही ठीक असाल तर आम्हीही ठीक आहोत. आधी तुम्ही कसे आहात ते सांगा,” अशी विचारपूस केली.सलमान खानची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्याचा नवा लूक आणि फिटनेस चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.

COMMENTS