मुख्यमंत्र्यांना चेष्टा-मस्करी करण्याची सवय… नाना पटोलेंची मिश्किल प्रतिक्रिया

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना चेष्टा-मस्करी करण्याची सवय… नाना पटोलेंची मिश्किल प्रतिक्रिया

प्रतिनिधी : नागपूर“मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नका, अशी प्रतिक्रिया सत्ताधारी पक्षांचे नेते देत आहेत. सध्या महाराष्ट्रात लोकांमध्ये ताणत

तुम्हाला तुमच्या जन्मदात्याचा अभिमान नाही, ही कुठली संस्कृती ?
मंत्री नव्हे, पंतप्रधानच बदलण्याची गरज नाना पटोले l DAINIK LOKMNTHAN
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी विशेष अधिवेशन

प्रतिनिधी : नागपूर
“मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नका, अशी प्रतिक्रिया सत्ताधारी पक्षांचे नेते देत आहेत. सध्या महाराष्ट्रात लोकांमध्ये ताणतणाव आहे. तसेच भाजपादेखील खूप तणावग्रस्त आहे.

त्यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला असेल. मुख्यमंत्र्यांची आधीपासूनच थट्टामस्करी करण्याची सवय आहे. आजही त्या पद्धतीने त्यांनी गंमत केली. शेवटी ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार असल्याचा विश्वास त्यांनी बऱ्याचदा बोलून दाखवला आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फारसे गांभीर्याने घ्यायची गरज नाही.”, अशी मिश्किल प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

औरंगाबादमध्ये मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान त्यांनी माझे आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, असा उल्लेख केला.

त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हेदेखील उपस्थित होते.

COMMENTS