Homeताज्या बातम्या

लव्हुरीत शिक्षणासाठी ग्रामस्थांचा एल्गारशिक्षकांच्या रिक्त पदांवरून श्री. बडेबाबा विद्यामंदिरला ठोकले टाळे

केज तालुक्यातील लव्हुरी येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी (दि. 9 जुलै 20

अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव नको; सर्वांवर समान कारवाई करा-रतन गुजर
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी घटनेनंतर महामार्गालगत विहिरींचा  प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर ! आतातरी प्राधिकरण आणि प्रशासनाला जाग येणार का?केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार – डॉ. गणेश ढवळे
5 लाखांसाठी विवाहितेचा छळ; 7 वर्षांच्या मुलासह घराबाहेर हाकलले



केज तालुक्यातील लव्हुरी येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी (दि. 9 जुलै 2026) श्री. बडेबाबा विद्यामंदिर शाळेला टाळे ठोकून कुलूपबंद आंदोलन केले. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
लव्हुरी येथील श्री. बडेबाबा विद्यामंदिरमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासन, शाळा व्यवस्थापन आणि संबंधित संस्थेकडे वारंवार निवेदने देऊन शिक्षक नियुक्तीची मागणी केली होती. मात्र, याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली. दरम्यान, ग्रामस्थांनी 3 जुलै 2026 रोजी प्रशासन व शाळा व्यवस्थापनाला निवेदन देऊन 9 जुलैपर्यंत नवीन शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र, दिलेल्या मुदतीत शिक्षकांची नियुक्ती न झाल्याने अखेर गुरुवारी सकाळी ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र येत शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. यावेळी आंदोलकांनी जोपर्यंत शिक्षकांची रिक्त पदे भरली जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. आंदोलनादरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकांना पालक व ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍यांसह निवेदन देण्यात आले.
शिक्षक नसतील तर मुलांनी शिकायचे कसे?
आमच्या मुलांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळ केला जात आहे. शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. तातडीने शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा संतप्त ग्रामस्थ व पालकांनी दिला. दरम्यान, या कुलूपबंद आंदोलनानंतर शिक्षण विभाग आणि शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोणती पावले उचलते आणि रिक्त शिक्षक पदे कधी भरली जातात, याकडे पालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS