कोपरगाव शहरावर लक्ष केंद्रित करून जास्तीत तपासण्या करा  – ना. बाळासाहेब थोरात

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कोपरगाव शहरावर लक्ष केंद्रित करून जास्तीत तपासण्या करा – ना. बाळासाहेब थोरात

मागील वर्षी आलेल्या कोरोना संकटापेक्षा यावर्षी आलेली कोरोनाची दुसरी लाट अतिशय गंभीर आहे.

15 हजारांचा गंडा घालणार्‍या भोंदूविरुद्ध कर्जत पोलिसात गुन्हा
स्नेहआशा बालगृहांमधील बालकांच्या मुत्यूची चौकशी
वडगाव गुप्ता येथे युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने जनसुरक्षा अभियान संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी  :- मागील वर्षी आलेल्या कोरोना संकटापेक्षा यावर्षी आलेली कोरोनाची दुसरी लाट अतिशय गंभीर आहे. त्यामुळे जास्त खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग व प्रशासनाने एकत्र येवून हि लढाई लढावयाची असून आरोग्य विभाग व प्रशासनाने येणाऱ्या अडचणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सोडवून घ्याव्यात. कोपरगाव तालुक्यात आढळून येत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेतल्यास निम्मे रुग्ण हे कोपरगाव शहरातील असून जास्तीत जास्त तपासण्या करून कोपरगाव शहरावर लक्ष केंद्रित करून कोरोनावर नियंत्रण मिळवावे अशा सूचना महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहेत.         

कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री ना. बाळसाहेब थोरात रविवार (दि.११) रोजी कोपरगाव दौऱ्यावर आले होते. यावेळी कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत आरोग्य विभाग व प्रशासनाशी संवाद साधतांना त्यांनी वरील सूचना केल्या. यावेळी कोपरगाव तालुकयातील कोरोना परिस्थितीबाबत आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या उपाय योजनांची माहिती देवून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे परिस्थिती परिस्थिती अवघड होत चालली असल्याचे सांगितले. बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून १०० ऑक्सिजन बेड व ५०० बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. मात्र एवढी मोठी व्यवस्था निर्माण करतांना याठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांची उणीव भासणार असून शासकीय यंत्रनेने कोपरगावसाठी तातडीने आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. शासकीय आरोग्य विभागाबरोबरच खाजगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या प्रमुखांना आवाहन करून रुग्णांना उपचार करण्याचे आवाहन केले आहे.                 

गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन व रेमडीसीव्हर इंजक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोपरगाव तालुक्याला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी. रेमडीसीव्हर इंजक्शनचा पुरवठा सुरळीत करून रेमडीसीव्हर इंजक्शनचा काळा बाजार होणार नाही याची खबरदारी घेवून ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून सर्व कोविड केअर सेंटरला रेमडीसीव्हर इंजक्शनचा पुरवठा करावा. वाढत असलेल्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी खाजगी तपासणी केंद्रांना तपासणी कीट उपलब्ध करून द्यावे त्याचे नियंत्रण ग्रामीण रुग्णालयाकडे ठेवून प्रत्येक ग्रामीण रुग्णालयास तपासणी कीट देवून तपासणी कीट संख्या वाढवून मिळावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे करून संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा जरी वाढत असला तरी शासकीय यंत्रना खंबीरपणे पाठीशी उभी राहिल्यास कोपरगाव तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेला काही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.                 

 यावेळी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या समवेत यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, खासदार मा.श्री. सदाशिव लोखंडे साहेब, आमदार सुधीरजी तांबे, मा.आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, पोलीस उपअधीक्षक. संजय सातव, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ.सौ. वैशालीताई बडदे, नायब तहसीलदार श्रीमती मनिषाताई कुलकर्णी, दिगंबर वाघ, पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग डडियाल, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, संग्राम देशमुख, नितीन शिंदे, मनसेचे अनिल गायकवाड, संतोष गंगवाल, योगेश गंगवाल, भाजप पदाधिकारी आदी उपस्थित होते.

COMMENTS