योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित, कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्यात अग्रेसर आहे. शंभर टक्के निक

योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित, कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्यात अग्रेसर आहे. शंभर टक्के निकाल व उत्कृष्ट शैक्षणिक सुविधेच्या जोरावर अल्पावधीतच महाराष्ट्रातील नामांकित तंत्रशिक्षण संस्था म्हणून विशेष सन्मान प्राप्त केला आहे. तंत्रशिक्षणातील शैक्षणिक मुल्यांकनामध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून 2025-26 या शैक्षणिक वर्षात संस्थेला उत्कृष्ठ नामांकन प्राप्त झाले आहे. संस्थेतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केले जाणारे प्रयत्न,विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार्या सोयीसुविधा,प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष व कॅम्पस- मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना मिळणारी नोकरी या बाबी लक्षात घेऊन तंत्रशिक्षण मंडळाकडून महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा ठरवला जातो.यामध्ये कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक मधील सिव्हील इंजिनियरिंग,कॉम्पूटर इंजिनियरिंग,मेकेनिकल इंजिनियरिंग, ऑटोमोबाईल इंजिनियरिंग या शाखांना उत्कृष्ट नामांकन प्राप्त झाले आहे ही बाब संस्थेच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद आहे. योगेश्वरी पॉलिटेक्निक मध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनिअरिंग या दोन नवीन अभ्यासक्रमांना देखील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद,नवी दिल्ली यांच्यातर्फे मान्यता देण्यात आली आहे.
मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षीत करण्याच्या उद्देशाने डॉ.सुरेश खुरसाळे यांच्या प्रेरणेतून वर्ष 2011 साली योगेश्वरी पॉलिटेक्निक या महाविद्यालयाची स्थापना झाली. कौटुंबिक परिस्थितीमुळे जर एखादा गरीब विद्यार्थी जर शिक्षणाकडे जाऊ शकत नसेल तर शिक्षणाने त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचले पाहिजे. या उद्देशाने पॉलिटेक्निक विभागाने गेल्या 15 वर्षात भरीव शैक्षणिक कार्य केले आहे.मराठवाड्याच्या ग्रामीण भागात, वाड्या वस्त्यांवरील इयत्ता दहावी उत्तीर्ण परंतु घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पुढील शिक्षण घेऊ न शकणार्या विद्यार्थ्यांचे पालकत्व स्विकारून त्यांना योगेश्वरी पॉलिटेक्निकच्या माध्यमातून तंत्रशिक्षीत केले. एवढेच नव्हे तर या होतकरू विद्यार्थ्यांना कँम्पस मुलाखतीमधून नौकरी देखील मिळवून दिली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वी महाविद्यालयास मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी केलेल्या शैक्षणिक योगदानाबाबत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
महाविद्यालयाने प्राप्त केलेल्या यशाबद्दल सर्व कर्मचार्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बर्दापूरकर, उपाध्यक्ष श्री .गणपत व्यास, का. उपाध्यक्ष अॅड. जगदीश चौसाळकर, सचिव श्री कमलाकरराव चौसाळकर, कोषाध्यक्ष डॉ. शैलेश वैद्य, संचालक श्री.प्रताप पवार व पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमण देशपांडे यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS