Homeताज्या बातम्या

सांगली जिल्हा बँकेतील नोकरभरतीचा मार्ग मोकळा

सांगली : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण देत राज्य शासनाने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लिपिक पदांच्या भरतीला स्थगिती दिल

थकबाकीदारांसाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबवा; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश
एकाच पक्षात आले तरी कदम कोहळीकर-आष्टीकर यांच्यातील राजकीय वैमनस्य कायम?जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारीवर कायदेशीर आक्षेप
बीडच्या विकास प्रश्नी डॉ.योगेश क्षीरसागरांनी घेतली पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट-अग्निशामक दलासाठी 2 वाहने मिळणार-रस्ते, शेतीसह प्रलंबित कामांवरही चर्चा
Sangli Bank Recruitment Stay Lifted by High Court; Clerk Vacancies Open


सांगली : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण देत राज्य शासनाने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लिपिक पदांच्या भरतीला स्थगिती दिली होती. मात्र निवडणूक निकालानंतरही ही प्रक्रिया सुरू न झाल्याने शासनाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर सुनावणी करताना, ’सरकारने आपले म्हणणे मांडावे, परंतु त्यासाठी नोकरभरती थांबवता येणार नाही,’ असे स्पष्ट करत न्यायालयाने बँकेतील नोकरभरती सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सांगली जिल्हा बँकेतील तब्बल 444 कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.

COMMENTS