तोहीद खान हत्या प्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष या गंभीर प्रकरणाकडे लागले आहे. या प्रकरणातील प्रत्येक दोषी आणि या कटामागील सूत्रधारांवर क

तोहीद खान हत्या प्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष या गंभीर प्रकरणाकडे लागले आहे. या प्रकरणातील प्रत्येक दोषी आणि या कटामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.
माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून केवळ प्रत्यक्ष आरोपी नव्हे, तर संपूर्ण कटाचा तपास करण्याची मागणी केली. मात्र या चर्चेदरम्यान आमदार प्रकाश सोळंके यांच्या भूमिकेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आज मुस्लिम समाजासह सर्वसामान्य जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे-आ. प्रकाश सोळंके यांच्या भूमिकेमुळे तोहीद खान प्रकरणातील न्यायाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे का? की त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ आहे? जर जनतेमध्ये गैरसमज निर्माण झाले असतील, तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करून संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हत्या प्रकरणासारख्या संवेदनशील विषयात राजकारणापेक्षा न्यायाला प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. दोषी कोणताही असो, त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, हीच समाजाची भूमिका आहे.
फारुख शेख
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बीड
रा. : बालेपीर, रोशनपुरा, बीड
मो. : 9370212347

COMMENTS