दि चिल्ड्रन्स एड सोसायटीतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – ॲड यशोमती ठाकूर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दि चिल्ड्रन्स एड सोसायटीतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – ॲड यशोमती ठाकूर

मुंबई दि. 16: दि चिल्ड्रन्स एड सोसायटीत असलेल्या बालकामगार, अनाथ, आपदग्रस्त आणि वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी आवश्

ताडोबात जिप्सींना लावणार जीपीएस यंत्रणा
पोलिस ठाण्यात हाणामारी करणार्‍यांवर कारवाईची चिन्हे
खास एफसी या ५ बटाटा वाणाचे पेटंट रद्द | LOKNews24

मुंबई दि. 16: दि चिल्ड्रन्स एड सोसायटीत असलेल्या बालकामगार, अनाथ, आपदग्रस्त आणि वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी आवश्यक कार्यक्रम राबविण्यात येईल असे महिला बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी सांगितले. 
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील दि चिल्ड्रन्स एड सोसायटीला गृह विभागामार्फत  सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे  सांगितले. मुंबईतील दि चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या कार्यकारी समितीची बैठक गृहमंत्री श्री. वळसे पाटील आणि महिला, बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय येथे आज झाली. यावेळी महिला व बाल विकास आयुक्त राहुल मोरे,कार्यकारी समिती सदस्य मिलिंद तुळसकर, महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय क्षीरसागर उपस्थित होते.  बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत बालगृहाचे नूतनीकरणाच्या प्रारूप आराखड्यास या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच प्रारूप आराखडा अंतिम मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.  संस्थेच्या जागावरील अतिक्रमाणाबाबत उच्च न्यायालयात दाखल विविध याचिकांवर कामकाज करण्यासाठी संस्थेच्या वतीने विशेष वकील नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेचा मागील वर्षाचा जमाखर्च अहवाल सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.  सोसायटीच्या मौजे बोर्ला येथील जागेवरील अतिक्रमण हटविणे. तसेच मौजे मानखुर्द येथील जागेचा भाडेकरार वाढविणे या विषयावर चर्चा झाली. तसेच कर्मचाऱ्यांना सेवा लाभ आणि सेवा नियमांमध्ये सुधारणा आदी विषयावर निर्णय घेण्यासाठी संबंधित विभागाबरोबर एक विशेष बैठक आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

COMMENTS