अन्न व औषध प्रशासनामुळे पुणेकरांचा जीव टांगणीला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अन्न व औषध प्रशासनामुळे पुणेकरांचा जीव टांगणीला

पुणे जिल्ह्यासाठी लागणार ऑक्सिजन जिल्ह्यातील चाकण येथून उपलब्ध होणे सहज शक्य असताना शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तिरपागड्या आदेशामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

Beed : महावितरणचा गलथान कारभार तार तुटून दोन एकर ऊस जळुन खाक ! (Video)
पारनेर नगर पंचायतीवर येणार राष्ट्रवादीची सत्ता
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतुन रोजगार निर्मिती

 पुणे / प्रतिनिधी: पुणे जिल्ह्यासाठी लागणार ऑक्सिजन जिल्ह्यातील चाकण येथून उपलब्ध होणे सहज शक्य असताना शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तिरपागड्या आदेशामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

गेल्या आठ-दहा दिवसांपासून पुण्यासाठीचा 70-75 टन ऑक्सिजन हजारो किलोमीटरचा प्रवास करून आणावा लागत आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच ऑक्सिजनच्या मागणीतदेखील मोठी वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्याची ऑक्सिजनची मागणी 250 टन वरून थेट 370-375 टनांपर्यंत गेली आहे. आतापर्यंत पुण्यासाठीचा हा ऑक्सिजन पुरवठा 90 टक्के चाकण येथून होत होता; परंतु आठ दिवसांपूर्वी शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने आदेश काढून पुण्याचा कोट्यात बदल केला. यामुळेच आता पुण्यासाठी आवश्यक असलेला 70-75 टन ऑक्सिजन जामनगर, बेल्लारी आणि थेट विशाखापट्टणम येथून आणावा लागत आहे. पुण्यातील चाकण येथून नाशिक, नगर आणि मराठवाड्याला पुरवठा करण्यात येत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्याने पुरवठ्यासाठी राज्य पातळीवर निर्णय घेतला गेला. पुण्यासाठी चाकण येथील प्रकल्पांतून तीनशे टन ऑक्सिजन मिळत आहे; मात्र पुण्याची गरज 370 ते 375 टनांची असल्याने प्रशासनाला तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना वेगळेच काम लागले आहे. ऑक्सिजन टँकर निघाले का, ऑक्सिजनसाठीचे विमान वेळेवर पोहचले का, विमान उड्डाणाला काही अडचण तर नाही ना, ऑक्सिजन प्रकल्पांत पुण्यासाठीच्या टँकरचा नंबर अगोदर कसा लागेल आणि हजारो किलोमीटरचा प्रवास करून आवश्यक ऑक्सिजन पुण्यात वेळेवर कसा पोहोचेल यासाठी दिवसरात्र धावपळ उडत आहे.

COMMENTS