HomeUncategorized

दहशदवादाचे मुंबई कनेकशन

एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा भाग राहिलेल्या पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधीत 6 दहशतवाद्यांना मंगळवारी (14 सप्टेंबर) ला अटक करण्यात आली. याच्या काही ता

राजभवनाच्या नावाने बँकेत खाते नसल्याने पैसे पक्षाला दिल्याचा न्यायालयात युक्तीवाद
जिवदान देणार्‍या दूताचा हृदय विकाराने मृत्यू; कावडी गावच्या माजी सरपंचाबाबतची हृदयद्रावक घटना
शहीद जवान वैभव भोईटे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा भाग राहिलेल्या पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधीत 6 दहशतवाद्यांना मंगळवारी (14 सप्टेंबर) ला अटक करण्यात आली. याच्या काही तासांनंतरच मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्ह जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालियाच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. समीर कालिया 12 सप्टेंबरपासून घरातून बेपत्ता होता आणि 14 रोजी त्याच्या अटकेची बाब समोर आली आहे. दिल्ली गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, मुंबईहून दिल्लीला जात असताना शेखला कोटा येथून एका ट्रेनमध्ये अटक करण्यात आली आहे.

अजुनही समीरची पत्नी आणि मुलींची मुंबईतील धारावी पोलिस ठाण्यात चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र एटीएस टीमला हे जाणून घ्यायचे आहे की समीर मुंबई किंवा महाराष्ट्राच्या इतर काही भागात इतर काही लोकांच्या संपर्कात होता का? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरच्या पत्नीने पोलिसांना सांगितले आहे की तिला समीर दहशतवादी असल्याचा कधीच संशय आला नाही. ड्रायव्हर असलेला शेख दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेजारी आणि कुटुंबीयांना धक्का बसला आहे. ते म्हणतात की शेख हा ‘फॅमिली मॅन’ आहे आणि त्याने कधीच कोणाशीही मोठ्या आवाजात बोलले देखील नाही.

समीरला शस्त्रे पुरवण्याचे काम सोपवण्यात आले होते
दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिमचा निकटवर्तीय, समीरला अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्हशी संबंधित पाक-आधारित व्यक्तींनी भारतातील विविध संस्थांना IED, शस्त्रे आणि ग्रेनेड पोहोचवण्याचे काम सोपवले होते. तपास एजेंसीच्या मते, अनीसने आगामी सणासुदीच्या काळात भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करण्याचा दहशतवादी कट रचला होता. तपास संस्थेच्या मते, त्यांचा हेतू दिल्ली, यूपी, महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यांमध्ये लक्ष्य हत्या आणि स्फोट घडवून आणणे हा होता.

या 6 जणांना अटक करण्यात आली
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने मंगळवारी जान मोहम्मद शेख उर्फ ​​समीर कालिया, ओसामा उर्फ ​​सामी, जीशान कमर, मोहम्मद अबू बकर, मोहम्मद आमिर जावेद, मूलचंद उर्फ ​​’साजू’ उर्फ ​​लाला यांना राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून अटक केली आहे. हे सर्व दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील मोठ्या शहरांना लक्ष्य करून मोठा धमाका करण्याची योजना आखत होते.

पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर दोन दहशतवादी दिल्लीत स्फोट करणार होते एकूण अटक केलेल्यांपैकी ओसामा उर्फ ​​सामी आणि जीशान कमर यांनी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने सांगितले की ते प्रथम विमानाने मस्कटला गेले आणि नंतर समुद्रमार्गे पाकिस्तानातील ग्वादर बंदरात गेले होते. त्यांना शस्त्रांचा वापर आणि स्फोटके बनवण्यासाठी पाकिस्तानमध्ये 15 दिवस प्रशिक्षण देण्यात आले, त्यानंतर तो त्याच मार्गाने भारतात परतले. भारतात परतल्यावर त्यांना IED लावण्यासाठी दिल्ली आणि यूपीमधील विविध ठिकाणांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवण्यात आले होते.

COMMENTS