Homeताज्या बातम्या

W.H.O च्या उत्तराने जगाचे टेन्शन वाढवले

कोरोनामुळे मानवी जीवनावर भयंकर वाईट परिणाम झाला आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेणारा हा विषाणू आजही जगात आहे. भारतासह सर्वच देशांना आतापर्यंत कोरोन

मुखेडच्या रोकडे विट उत्पादक समूहास अभिनेत्री हृता दुर्गुडे हिच्या हस्ते नाशिक उद्योजक पुरस्कार प्रदान  
तुर्की भूकंपाने घेतले अनेक जीव
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

कोरोनामुळे मानवी जीवनावर भयंकर वाईट परिणाम झाला आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेणारा हा विषाणू आजही जगात आहे. भारतासह सर्वच देशांना आतापर्यंत कोरोना विषाणूची पहिली आणि दुसरी लाट सहन करावी लागली आहे. यामुळे कोरोना कधी संपणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर WHO नं दिलं आहे.

कोरोनाला अजून महामारीच्या श्रेणीतच ठेवलं जाईल, कारण हा विषाणू लगेचच जाणार नाही. संघटनेच्या या विधानातून हे स्पष्ट होतं की जगाला अजूनही प्रसार रोखण्यासाठी निर्बंध पाळणं गरजेचं आहे. कारण कोरोनाचे नवे व्हेरिएंट काळजी वाढवत आहेत, असं WHO नं म्हटलं आहे.

लोकांना लस दिली जाईल तेव्हा लोकांची इन्युनिटी वाढेल आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण आपोआप कमी होईल. या स्थितीत पोहोचल्यानंतर कोरोनाला महामारीच्या श्रेणीतून हटवलं जाईल, असंही WHO नं म्हटलं आहे.

दरम्यान, भारतातील कोरोनाच्या स्थितीचे कारण त्याची व्याप्ती आणि देशाच्या विविध भागातील लोकांची रोगप्रतिकारक शक्ती आहे. एवढेच नाही तर भविष्यात कोरोनाची प्रकरणे अशीच कमी होत व वाढत राहू शकतात, असं WHO च्या अधिकाऱ्यानं म्हटलंय.

COMMENTS