Homeताज्या बातम्या

नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; हजारो नागरिकांचा सहभाग, ‘करो योग रहो निरोग’चा संदेश

<img src="https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcSwJS6hipjljwe2b6AR3e65OKIOlYWSD0sfiA7BGI5CXA&s=10" alt="अंतरराष

सौ. के.एस.के. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
के. एस. पी. विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा! विद्यार्थ्यांचे योगासन प्रात्यक्षिक
योग दिनानिमित्त पाच दिवस मोफत ऑनलाइन योग वेबिनारचे आयोजनसहभागी होण्याचे राधा तांबे यांचे आवाहन


नांदेड : आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित करण्यात आलेला 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन नांदेडमध्ये रविवारी मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. वजिराबाद येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित या कार्यक्रमात विविध शासकीय अधिकारी, विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, क्रीडापटू, योगप्रेमी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
यावेळी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. योग ही आरोग्यासाठी संजीवनी असून, निरोगी जीवनासाठी प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ‘करो योग रहो निरोग’ हा संदेश देत सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून स्वीकारल्यानंतर जगभरात योगाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या योगविद्येचा जागतिक स्तरावर होत असलेला गौरव ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय, महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस प्रशासन, माय भारत,  पतंजली योग समिती, योग विद्या धाम आणि विविध क्रीडा व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाला नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे, सहायक जिल्हाधिकारी डॉ. बी. सरवणन, पोलीस उपअधीक्षक अश्विनी जगताप, युवा अधिकारी अस्नी कनकटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे, पत्रकार राजेश निस्ताने, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पतंजली योग समिती, योग विद्या धाम च्या प्रशिक्षकांनी आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉलनुसार विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर केले. उपस्थितांना योगाभ्यासाचे प्रत्यक्ष धडे देण्यात आले. जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी, क्रीडा संघटनांचे खेळाडू, महाराष्ट्र महिला पोलीस संघ, स्काऊट-गाईड सदस्य तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योग दिनाला भव्य स्वरूप दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना भागवत यांनी केले, तर आभार प्रदर्शन राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.

COMMENTS