एक लाखांची लाच घेतांना शाखा अभियंता अटकेत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एक लाखांची लाच घेतांना शाखा अभियंता अटकेत

मुंबई ः मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाचे भुसंपादनात सदर बांधकामाचेमूल्यमापन करून अहवाल देण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली आहे.यातील चार लाख या

राष्ट्रवादी विरोधात सर्वाना बरोबर घेऊन आगामी निवडणूका लढविणार : निशिकांत पाटील
दिव्यांगांच्या राज्य नाट्य स्पर्धेत “रिले” नाटक प्रथम 
मुंबईत 19 हजार क्षयरोग रुग्णांना घेतले दत्तक



मुंबई ः मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाचे भुसंपादनात सदर बांधकामाचे
मूल्यमापन करून अहवाल देण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली आहे.
यातील चार लाख यापूर्वी स्वीकारले असून, पुन्हा एक लाखांच्या लाचेची
मागणी करणार्‍या सार्वजनिक बांधकाम कल्याण उपविभागीय शाखा अभियंता अविनाश
भानुशाली याला  एक लाख रुपये लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाने आज सोमवार ता 13 सप्टेंबर रोजी रंगेहाथ अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीचे मालकीच्या जमीनीवरील बांधकाम हे मुंबई
वडोदरा द्रुतगती महामार्गाचे भुसंपादनात जात असल्याने सदर बांधकामांचे
मुल्यमापन करुन अहवाल देण्यासाठी कल्याण सार्वजनिक बांधकाम उपविभागीय
अभियंता कार्यालयामधील उपविभाग शाखा अभियंता अविनाश पांडुरंग भानुशाली
याने 9 सप्टेंबर 2021 रोजी पडताळणी दरम्यान यापूर्वी 4 लाख स्विकारल्याचे
मान्य करुन आणखी एक लाख रकमेच्या लाचेची मागणी करुन त्याशिवाय अहवाल
मिळणार नाही असे सांगितले. त्यावरुन आज सोमवार ता 13 सप्टेंबर रोजी ठाणे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कल्याण मधील सार्वजनिक बांधकाम विभाग कल्याण
उपविभागीय कार्यालयमध्ये सुमारे एक लाख रुपयांची लाच घेताना शाखा अभियंता
अविनाश पांडुरंग भानुशाली यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

COMMENTS