Homeताज्या बातम्या

देगलूर-बिलोलीत उभारणार अत्याधुनिक ‘कृषी भवन’; शेतकऱ्यांसाठी आमदार जितेश अंतापूरकर यांचे मोठे पाऊल

कुंडलवाडी : देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व कृषी सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आमदार जितेश अंतापूरकर यांनी विशे

 कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे राज्यभर आंदोलनआज कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना निवेदन देणार  
कर्जमाफी आणि पीकविमा प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे किसान सभेला आश्वासन
थकीत पीक विमा नुकसानभरपाई तात्काळ वितरित करा : आ. बोंढारकर यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

कुंडलवाडी : देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व कृषी सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आमदार जितेश अंतापूरकर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. देगलूर आणि बिलोली येथे अत्याधुनिक व सर्व सोयी-सुविधांनी युक्त ‘कृषी भवन’ उभारण्यासाठी त्यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे ३५ कोटी रुपयांच्या निधीची आग्रही मागणी केली आहे.

सध्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना विविध कृषीविषयक कामांसाठी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. ही अडचण दूर करण्यासाठी प्रस्तावित कृषी भवनामध्ये आधुनिक तालुका कृषी कार्यालय, प्रशस्त बैठक व प्रशिक्षण हॉल, कृषी साहित्य साठवणुकीसाठी सुसज्ज गोदाम, वाहनतळ तसेच शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक विविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या भव्य प्रकल्पामुळे कृषी विभागाच्या योजना, आधुनिक शेती तंत्रज्ञान, प्रशिक्षण कार्यक्रम आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवणे शक्य होईल. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि पैशांची मोठी बचत होणार आहे. आमदार अंतापूरकर यांच्या या प्रस्तावाला शासन स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, लवकरच या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS