पुण्यातील ‘बिग बास्केट’च्या गोदामाला भीषण आग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील ‘बिग बास्केट’च्या गोदामाला भीषण आग

पुणे : बावधन येथील बिग बास्केटच्या गोदामाला रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. सुमारे २५ हजार स्क्वेअर फुट असलेले हे पत्

बापाने पोटच्या मुलीचा नरबळी देण्याचा केला प्रयत्न
अपघातात 8 भाविकांचा होरपळून मृत्यू
नक्टीच्या लग्नाला सतरा इग्न. राष्ट्रीय महामार्गाचे काम काही होईना

पुणे : बावधन येथील बिग बास्केटच्या गोदामाला रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. सुमारे २५ हजार स्क्वेअर फुट असलेले हे पत्र्याचे संपूर्ण गोदाम या आगीमुळे पूर्णपणे नष्ट झाले आहे. गोदामाचा लोखंडी सांगाड्याचे चॅनेलही वाकले इतकी भीषण ही आग होती. आगीमध्ये धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झाले. पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड व पीएमआरडीए व एमआयडीसी येथील एकूण १२ फायरगाड्या व वॉटर टँकरच्या सहाय्याने ही आग विझविण्यात यश आले. आग लागताच गोदामातील सर्व जण बाहेर आल्याने कोणीही जखमी झाले नाही.

याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी मेमाणे यांनी सांगितले की, बावधन बुद्रुक येथे नागरिकांना घरपोच भाजीपाला, धान्य, किराणा पोहचविणार्या बिग बास्केट या कंपनीचे सुमारे २५ हजार स्क्वेअर फुटाचे गोदाम आहे. हे गोदाम संपूर्णपणे पत्र्यांचे शेड असून त्याला सुमारे १२ ते १३ शटर होती. रविवारी रात्री साडेअकरा वाजता या गोदामाला आग लागली. गोदामाला लागूनच मालाची वाहतूक करणारी वाहने व दुचाकी पार्क केल्या होत्या. त्यांनाही या आगीची झळ बसून ती वाहने पेटवून खाक झाली.

COMMENTS