Parbhani : मॉर्निंग वॉक करणाऱ्या चार नागरिकांना ट्रकने चिरडले…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Parbhani : मॉर्निंग वॉक करणाऱ्या चार नागरिकांना ट्रकने चिरडले…

मानवत तालुक्यातील केकरजवळा गावातील मॉर्निंग वॉक करणाऱ्या चार नागरिकांना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने चिरडले आहे .यात दोन जण जागीच ठार झाले आहेत.

परभणीला कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून दूर ठेवण्यास प्रशासन प्रयत्नशील – जिल्हाधिकारी आंचल गोयल
आयपीएलवर सट्टा लावणार्या सट्टेबाजांवर सेलूत छापा; चार आरोपींविरुध्द गुन्हा दाखल
मोबाईल टॉवरची बॅटरी चोरणारे मोठे रॅकेट उघडकीस; सात आरोपी अटकेत; तिघे फरार, शोध सूरू

मानवत तालुक्यातील केकरजवळा गावातील मॉर्निंग वॉक करणाऱ्या चार नागरिकांना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने चिरडले आहे .यात दोन जण जागीच ठार झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज पहाटेच्या सुमारास पोलिस पाटील उत्तमराव लाडाणे, आत्माराम लाडाणे, नंदकिशोर लाडाणे, राधाकिशन लाडाणे पाथरी पोखर्णी रोडवर मॉर्निंग वॉक करत असताना पोखर्णीहुन पाथरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने या चारही जणाना धडक दिली. यात उत्तमराव लाडाणे व आत्माराम लाडाणे यांचा जागीच मृत्यू झाला तर नंदकिशोर लाडाणे व राधाकिशन लाडाणे यांच्यावर परभणी येथे उपचार चालू आहेत.

COMMENTS