Homeताज्या बातम्या

परशुराम संस्कार सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

बीड : परशुराम संस्कार सेवा संघ, बीड जिल्हा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्राह्मण समाजातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिन

काळेगाव हायस्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के7 विद्यार्थिनींची 90 टक्क्यांहून अधिक गुणांची कमाई
आजची पिढी अभ्यासू म्हणून गुणवंतांची संख्या वाढतेय-रमेशराव आडसकरसंत तुकाराम पब्लिक स्कुलचा वर्धापन दिन ; समर कॅम्पला प्रारंभ
आदित्य महाविद्यालयात रुग्णांच्या प्रत्यक्ष सेवेचे मूल्यमापन कार्यशाळाविद्यार्थ्यांच्या क्लीनिकल व व्यावसायिक कौशल्य विकासासाठी 6 तास विशेष प्रशिक्षण.


बीड : परशुराम संस्कार सेवा संघ, बीड जिल्हा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्राह्मण समाजातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या पदाधिकारी बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
इयत्ता दहावी (एसएससी, सीबीएसई, आयसीएसई) तसेच बारावी (एचएससी) परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव रविवार, दि. 21 जून 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजता कोरडे गणपती मंदिर कार्यालय, काळे गल्ली, बीड येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून, त्यासाठी विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव व गुणपत्रिकेची प्रत संबंधित पदाधिकार्यांच्या व्हॉट्सप क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील अधिकाधिक गुणवंत विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. याबाबतची माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद खडकीकर यांनी दिली. तसेच समाजातील सर्व स्तरांतील पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने नोंदणी करून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहनही त्यांनी केले. नोंदणी व अधिक माहितीसाठी श्री. गजानन जोशी, बाळासाहेब थिगळे (मो.9423172327) संजय कुलकर्णी, बाबा पाठक, मुकुंद खडकीकर, सौ. मंगलताई आगवान, सौ. सुषमाताई थिगळे आणि सौ. अर्चनाताई जोशी यांच्याशी संपर्क साधावा, असे संघातर्फे कळविण्यात आले आहे.

COMMENTS