Homeताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीत 150 कोटींचा घोडेबाजारठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी घडलेल्या राजकीय घडामोडी

गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन
विधानपरिषदेवर संधी हे श्रद्धा-सबुरीचे फळ : आ. कोल्हे  
राज्यात कोणतीही इंधनटंचाई नाही : मुख्यमंत्री फडणवीसपंतप्रधान मोदींवर टीका टाळावी ; विधान परिषद निवडणूक महायुती एकत्र लढणार


मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी घडलेल्या राजकीय घडामोडींनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. एकीकडे पाच जागा बिनविरोध झाल्याने सत्ताधारी महायुतीला मोठे यश मिळाले असताना, दुसरीकडे या प्रक्रियेदरम्यान 150 कोटींचा घोडेबाजार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
राज्यातील 17 जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत अर्ज माघारीनंतर पाच जागांवरील निकाल मतदानापूर्वीच निश्‍चित झाले आहेत. उर्वरित 12 जागांवर आता थेट निवडणूक होणार आहे. मात्र काही मतदारसंघांत उमेदवारांनी अचानक माघार घेतल्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांनी समाजमाध्यमांद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करत बिनविरोध निवडींच्या पार्श्‍वभूमीवर गंभीर प्रश्‍न उपस्थित केले. उमेदवारांच्या माघारीसाठी आणि बिनविरोध निवडी घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, या संपूर्ण प्रक्रियेत एका दिवसात तब्बल 150 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा असून काही उमेदवारांनी स्वतःची राजकीय किंमत ठरवून निर्णय घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोकण, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे परिसरातील घडामोडींचा उल्लेख करत राऊत यांनी अशा प्रकारच्या हालचाली लोकशाही व्यवस्थेसाठी चिंताजनक असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या आरोपांनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून या विषयावर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. दरम्यान, अर्ज माघारीनंतर महायुतीच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी लाभ झाल्याचे चित्र दिसून आले. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले.

COMMENTS