Homeताज्या बातम्या

भगवानगडासाठी प्रतापराव ढाकणे यांची ५१ लाखांची देणगी; ज्ञानेश्वर माऊली मंदिराचे काम प्रगतिपथावर

खरवंडी कासार : श्रीक्षेत्र भगवानगडाच्या विकासकामांसाठी संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रतापराव ढाकणे

मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात; सात गावांतील ८६४ हेक्टर क्षेत्राला मिळणार जीवदान
संभाजी ब्रिगेडच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी सोमनाथ गोडसे; तर उपाध्यक्षपदी शाम पोळ
उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली मुस्लिम आमदारांची बैठक; इद्रीस नायकवाडी प्रकरण आणि अल्पसंख्याक विभागाच्या प्रश्नांवर होणार चर्चा
ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर भगवान गडावर || यामागच कारण काय ? लय भारी ||

खरवंडी कासार : श्रीक्षेत्र भगवानगडाच्या विकासकामांसाठी संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी स्वर्गीय बबनराव ढाकणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५१ लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे.

मौजे अकोला येथे संतश्रेष्ठ भगवानबाबांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार दर तीन वर्षांनी होणारा अधिकमास सप्ताह नुकताच पार पडला. या सप्ताहाच्या सांगता समारंभात प्रतापराव ढाकणे यांनी या मोठ्या देणगीची घोषणा केली. यावेळी भगवानगडाचे मठाधिपती न्यायाचार्य डॉ. नामदेवशास्त्री, कृष्णा महाराज, जगन्नाथ महाराज यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भगवानगडावरील ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित असून राज्यभरातून देणगीचा ओघ सुरू आहे. मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू असून ते राज्यातील एक आदर्श धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प आहे.

यावेळी प्रतापराव ढाकणे म्हणाले की, “ढाकणे परिवार आणि भगवानगड यांचे अतूट नाते आहे. भगवानबाबांच्या विचारांनी समाजाला दिशा दिली असून न्यायाचार्य डॉ. नामदेवशास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली उभारले जाणारे हे मंदिर भाविकांसाठी प्रेरणास्थान ठरेल.” तसेच गडावरील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमातून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचाही त्यांनी अभिमानाने गौरव केला.

COMMENTS