Homeताज्या बातम्या

श्रीरामपुरात एटीएसची छापेमारी; आक्षेपार्ह सोशल मीडिया संशयावरून चौघांची चौकशी

श्रीरामपूर : शहरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) धडक कारवाई करत विविध भागांतील ७ ते ८ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. सोशल मीडियाच्या माध

पेट्रोल-डिझेल टंचाई आणि महागाईविरोधात दुचाकी वाहनांची अंत्ययात्रा; बीडमध्ये लक्ष्यवेधी आंदोलन
उद्योजक वैभव क्षीरसागर यांच्या पुढाकारातून बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांना ‘राजे शिवाजी’ चित्रपटाचा आनंद
पुढच्या १० दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची चौंडीत मोठी घोषणा
श्रीरामपूर - पाकिस्तान कनेक्शनच्या संशयाने श्रीरामपुरात एटीएसची धडक ;  चौघांची चौकशी ; शहरात खळबळ

श्रीरामपूर : शहरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) धडक कारवाई करत विविध भागांतील ७ ते ८ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानशी संबंधित रिल्स पाहणे व त्यावर आक्षेपार्ह स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्याblockच्या संशयावरून शहरातील चार जणांची सखोल चौकशी करण्यात आली असून, त्यांना नोटिसाही बजाविल्याचे समजते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानातील कथित गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित काही व्यक्तींशी श्रीरामपूरमधील काही तरुणांचा संपर्क असल्याची माहिती तपास यंत्रणांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने शहरातील विविध ठिकाणी नियोजनबद्ध छापेमारी करत संशयितांची चौकशी सुरू केली. तपास यंत्रणांच्या प्राथमिक अंदाजानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपर्क प्रस्थापित करून काही महत्त्वाच्या व्यक्तींबाबत माहिती संकलित करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तसेच काही ठिकाणांची रेकी करण्यात आल्याचा संशयही तपासाच्या केंद्रस्थानी आहे. या अनुषंगाने जप्त करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्यांचे बारकाईने विश्लेषण करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान संशयितांकडून मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच सोशल मीडिया व्यवहारांशी संबंधित माहिती जप्त करण्यात आली आहे. या तपासातून आणखी महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संपूर्ण प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू आहे.

COMMENTS