Homeताज्या बातम्या

भंडाऱ्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई; मधुमेह, हृदयरोग त्वरित बरे करण्याचा दावा करणारी औषधे जप्त

भंडारा : गंभीर आजारांवर त्वरित परिणाम होतो, अशा भ्रामक आणि कायद्याला धरून नसलेल्या दाव्यांद्वारे औषधांची विक्री करणाऱ्या दोन औषध प्रतिष्ठानांवर अ

नांदेडमध्ये ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’; प्रिस्क्रिप्शनशिवाय नशेच्या गोळ्या विकणाऱ्या दोन मेडिकलवर छापा
शेवगावात अन्नभेसळविरोधी धडक कारवाई; दूध डेअरींवरील पदार्थांचे नमुने जप्त, विक्रेत्यांत खळबळ
सावधान! तुम्ही खाताय तो नाश्ता सुरक्षित आहे का? चक्क नाल्याच्या घाण पाण्यापासून बनतोय नाश्ता
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत 189 जागांसाठी भरती

भंडारा : गंभीर आजारांवर त्वरित परिणाम होतो, अशा भ्रामक आणि कायद्याला धरून नसलेल्या दाव्यांद्वारे औषधांची विक्री करणाऱ्या दोन औषध प्रतिष्ठानांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ३० हजार रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. जनतेची दिशाभूल करून आरोग्याशी संबंधित खोटे दावे केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या भंडारा येथील पथकाने शहरातील दोन औषध विक्री केंद्रांची तपासणी केली. या तपासणीत विविध औषधांच्या वेष्टनांवर (पॅकिंग) आणि प्रचार साहित्यामध्ये मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा, नेत्रविकार, गलगंड तसेच स्त्री-पुरुषांमधील काही वैयक्तिक आरोग्य समस्यांवर तत्काळ गुण येण्याचे दावे करण्यात आल्याचे आढळून आले.

राम मंदिर मार्गावरील बडा बाजार परिसरातील एका आयुर्वेद औषधालयातून १२ हजार १८० रुपयांचा, तर राजीव गांधी चौक परिसरातील दुसऱ्या औषध विक्री केंद्रातून १७ हजार ६१२ रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला. एकूण २९ हजार ७९२ रुपयांचा साठा पंचनाम्याद्वारे ताब्यात घेण्यात आला आहे. तपासणीदरम्यान एकूण १५ प्रकारच्या औषधांवर आक्षेपार्ह स्वरूपाचे दावे आणि जाहिराती आढळून आल्या. संबंधित औषधांच्या पॅकिंगवर गंभीर आजारांवर निश्चित आणि त्वरित परिणाम होतो, असा मजकूर छापण्यात आला होता.

COMMENTS