Homeताज्या बातम्या

मान्सूनची आनंदवार्ता; केरळमध्ये दाखल! पुढील सात दिवस विविध राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम : भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी केरळमध्ये नैऋत्य मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून, यासोबतच देशातील पा

मान्सूनची आनंदवार्ता! केरळमध्ये मान्सून दाखल; देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज
उत्तर प्रदेश-बिहारमध्ये अवकाळीमुळे ४८ जणांचा मृत्यू; देशात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज
देशात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट
Monsoon Update - खूपच चांगली बातमी! महाराष्ट्रात लवकरच कोसळणार धो-धो पाऊस..  अखेर मान्सून केरळात दाखल! - monsoon update 2026 arrived in kerala when will  it reach maharashtra rain imd -

नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम : भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी केरळमध्ये नैऋत्य मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून, यासोबतच देशातील पावसाळी हंगामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. यंदा मान्सून नेहमीच्या वेळेपेक्षा सुमारे तीन दिवस उशिराने केरळ किनारपट्टीवर पोहोचला असला, तरी आगामी काळात त्याच्या प्रगतीचा वेग वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील सात दिवस केरळ, तमिळनाडू, कर्नाटक तसेच दक्षिण भारतातील काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनामुळे शेतकरी, जलसंपदा विभाग आणि सर्वसामान्यांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे. देशातील २४ राज्यांसाठी पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.

ओडिशा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, तेलंगणा आणि इतर अनेक राज्यांमध्ये हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाबरोबरच वादळी वाऱ्यांचा धोका लक्षात घेऊन विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिल्ली परिसरातही पुढील दोन दिवसांसाठी खबरदारीचा इशारा जारी करण्यात आला आहे.

केरळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अलप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांसाठी तीव्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत ११ ते २० सेंटीमीटरपर्यंत पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हवामान तज्ज्ञांच्या मते, वातावरणात निर्माण होणारे उंच आणि घनदाट मेघसमूह हे तीव्र पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी परिस्थितीस कारणीभूत ठरत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्यासह हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

काही भागांत उष्णतेचा प्रभाव कायम: एकीकडे मान्सूनची प्रगती सुरू असताना दुसरीकडे देशातील काही भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम आहे. गुजरात, पश्चिम राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि तमिळनाडूतील अनेक शहरांमध्ये तापमान अजूनही ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदविले जात आहे.

चौकट: या राज्यांमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज

हवामान विभागाने शुक्रवार ५ जून आणि शनिवार ६ जून या दिवशी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

  • ५ जून रोजी : राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, ओडिशा आणि किनारी आंध्र प्रदेशात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. अंदमान-निकोबार बेटे, केरळ, कर्नाटक, लक्षद्वीप, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकल येथे मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही भागांत गारपीट होण्याची शक्यता आहे.
  • ६ जून रोजी : पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये पाऊस व वादळी हवामान कायम राहू शकते. दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, पुडुचेरी आणि आंध्र प्रदेशात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

COMMENTS