गलितगात्र काँग्रेस !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

गलितगात्र काँग्रेस !

135 वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असलेला काँग्रेस पक्ष आता गलितगात्र झाला आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काँगे्रसची संपूर्ण देशावर काँगे्रसची एकह

चीनमध्ये पुन्हा जिनपिंग राज
वाढते अपघात चिंताजनक
मुदतपूर्व चाळवाचाळव  

135 वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असलेला काँग्रेस पक्ष आता गलितगात्र झाला आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काँगे्रसची संपूर्ण देशावर काँगे्रसची एकहाती सत्ता होती. मात्र आज काँगे्रसची सत्ता तीन राज्यात असून, त्या राज्यात देखील संदोपसुंदी सुरू आहे. त्यामुळे सर्वात जुना असलेल्या काँगे्रस पक्षाची आजची अशी परिस्थिती असतांना काँगे्रस नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याऐवजी आपला इतिहास उगळण्यात अर्थ नाही. नुकतेच शरद पवार यांनी काँगे्रसविषयी केलेल्या विधानाला अर्थ प्राप्त झाला आहे. अर्थात राज्यात काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रस सत्तेत सहभागी असले, तरी देखील शरद पवार काँगे्रसवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझे होते, असे सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झाली. असे शरद पवार म्हणाले. वास्तविक पाहता पवारांनी काँगे्रसला उघड सल्ला देण्याची, किंवा टीका करण्याची ही पहिली वेळ नाही. देशाच्या राजकारणांत आगामी 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांची रणनीती आखण्यात येत असतांना, या प्रक्रियेमध्ये काँग्रेस अजून कुठे दिसत नाही. राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांच्या बैठका झाल्या असल्या, तरी त्यांना काँगे्रसमध्ये प्रवेश देण्यात अनेक ज्येष्ठ नेत्यांचा विरोध आहे. याविरोधात काँगे्रसची जी-23 नेत्यांची टीमने एकत्र येत पुन्हा एकदा बैठक घेतली. त्यामुळे काँगे्रसला जुन्या नेत्यांचा आणि नवीन येऊ घातलेल्या नेत्यांचा समन्वय साधण्यासाठी एकत्र येऊन यातून मार्ग काढण्याची गरज आहे.
शरद पवार यावर बोलतांना म्हणाले की, काँग्रेसची नेतेमंडळी राहुल गांधी हे विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, असे सांगतात. यावर भाष्य करताना शरद पवार, काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात. असे देखील म्हणाले होते. काँगे्रसची संपूर्ण देशावर एकहाती सत्ता होती, हा इतिहास झाला आहे. आज वर्तमानात काँगे्रसची अवस्था दयनीय झाली असतांना, काँगे्रसला पुन्हा एकदा नवीन झळाळी देण्याची गरज आहे. काँगे्रसला अनेक वर्षांपासून अध्यक्ष नाही. सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष म्हणून पक्षाचा गाडा हाकतांना दिसून येत आहे. राहुल गांधी काँगे्रसचे अध्यक्ष नसले, तरी बहुतांश निर्णय तेच घेतांना दिसून येत आहेत. शिवाय त्यांना प्रियंका गांधी सहकार्य करतात. त्यामुळे काँगे्रसमध्ये सोनिया गांधी आणि राहुल, प्रियंका गांधी निर्णय घेतात. त्यामुळे इतर नेत्यांना निर्णय घेता येत नाही. काँगे्रसचा हायकमांड ही संस्कृती मोडीत काढण्याची गरज असून, त्यासाठी काँगे्रसने पुढाकार घेण्याची गरज आहे. काँगे्रसकडे प्रियंका गांधी यांचा एक वलय असणारा आणि इंदिरा गांधी यांच्या साधर्म्य असलेला चेहरा आहे. त्यामुळे प्रियंका गांधीकडे दुसरी इंदिरा गांधी म्हणून बघितले जाते. प्रियंका गांधी या उत्तरप्रदेशातील निवडणुकांत सक्रीय झाल्या असून, त्याचा काँगे्रसला नक्कीच फायदा होईल. मात्र काँगे्रसला तिथील स्थानिक पक्षांशिवाय युती करण्याशिवाय पर्याय नाही. काँगे्रस, भाजप, बसपा आणि समाजवादी पक्ष वेगवेगळे लढले तर त्याचा फायदा साहाजिकच काँगे्रसला होतो. त्यामुळे काँगे्रसला जागा कमी मिळाल्या तरी चालतील, मात्र प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करणे काँगे्रससाठी फायद्याचे ठरणारे आहे. पंतप्रधान मोदी यांच्या तुलनेत सोनिया व राहुल गांधी यांचे नेतृत्वगुण अगदीच फिके आहेत, यात दुमत असायचे कारणच नाही. मोदी यांची जनमानसावर पकड आहे, यातही वाद नाही. तरीही निवडणुका आल्या, की आपल्या सरकारनं ’अच्छे दिन’ आणण्यासाठी काय काय केलं, यावर भर देत मतदारांचं प्रबोधन करीत मतं मागण्याऐवजी, मोदी यांचा भर राहिला आहे, तो काँग्रेसवर शरसंधान साधण्यावर आणि जोडीला वेळ पडेल तेव्हा, पाकिस्तान व त्याच्या अनुषंगाने मुस्लिमांच्या अनुनयासाठी काँग्रेसला जबाबदार धरण्यावरच ते धन्यता देतात. निवडणुकांच्या वेळी जमातवादी ध्रुवीकरणाच्या राजकारणापलीकडे मोदी गेल्या सहा वर्षांत एकदाही गेलेले नाहीत… आणि हे करताना त्यांनी कायम काँग्रेसलाच जबाबदार धरले आहे. असे असले तरी पश्‍चिम बंगालमधील निकाल मोदी यांच्या प्रतिमेला तडा देणारे आहेत. कारण ममता दीदी भाजपला जोरदार टक्कर देत एकहाती विजय मिळवून आणला. तो कित्ता काँग्रेस गिरवू शकते, त्यासाठी काँगे्रसला रणनीतीची आणि आक्रमक होण्याची गरज आहे. मात्र आजची काँगे्रस गलितगात्र झालेली दिसून येते.

COMMENTS