Oplus_16908288 शेवगाव : मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, नाशिक विभाग येथे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे अहिल्यानगर येथील अन्न सुरक्षा अधिकारी राजेश

शेवगाव : मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, नाशिक विभाग येथे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे अहिल्यानगर येथील अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांच्याविरोधातील प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेवगाव दूध भेसळ प्रकरणाशी संबंधित या विषयाची अधिकृत स्तरावर दखल घेऊन नाशिक विभागाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांकडे हे प्रकरण चौकशीसाठी सोपवण्यात आले आहे.
तक्रारदार शैलेश जायभाये यांनी १९ एप्रिल २०२६ रोजी या संदर्भात निवेदन सादर केले होते. अन्न भेसळ विभागाच्या कार्यालयात अनौपचारिकरीत्या पत्रकार परिषद घेऊन माहिती दिल्यासंदर्भात या तक्रारीत उल्लेख करण्यात आला होता. मुख्यमंत्री सचिवालयाने शासन नियमांनुसार निर्धारित कालमर्यादेत या तक्रारीची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या चौकशीचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्याचे व तक्रारदारास त्याची माहिती देण्याचे सूचित केले आहे. हे आदेश नाशिक विभागाचे विशेष कार्याधिकारी यांच्या स्तरावरून जारी करण्यात आले आहेत.
अधिकृत भूमिका अस्पष्ट या संदर्भात जिल्हा अन्न प्रशासन अधिकारी अपर्णा भोईटे तसेच नाशिक येथील सह अन्न प्रशासन आयुक्त मंगेश माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही अधिकाऱ्यांनी दूरध्वनीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रकरणावर त्यांची अधिकृत भूमिका समजू शकली नाही.

COMMENTS