Homeताज्या बातम्या

इराण अण्वस्त्रे न बनवण्याचे आश्वासन शांतता करारात अटी आणखी कडक : ट्रम्प

वाशिंग्टन; वृत्तसंस्था : इराण अण्वस्त्रे विकसित करणार नाही, असे ठोस आश्वासन इराणकडून मिळाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांन

अरबी समुद्रात अमेरिका आणि इराण पुन्हा समोरासमोर; अमेरिकन नौदलाने इराणचे जहाज गोळीबार करून जप्त
पाकिस्तानात पेट्रोल 458, डिझेल 520 रुपयांच्या पुढे
युद्ध संपू शकते पण.. जखमांचे काय ?
इराणला कधीच अण्वस्त्रधारी देश बनू देणार नाही; ट्रम्प यांची धमकी, अमेरिका-इस्रायलनं युद्ध पुकारलं - Marathi News | Will never allow Iran to become a nuclear-armed state ...

वाशिंग्टन; वृत्तसंस्था : इराण अण्वस्त्रे विकसित करणार नाही, असे ठोस आश्वासन इराणकडून मिळाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी तेहरानला (इराण) पाठवलेल्या शांतता प्रस्तावात अटी अधिक कडक केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे मध्य पूर्वेतील युद्ध अधिकृतपणे संपवण्यासाठी आणि होर्मुझ सामुद्रधुनी हा सागरी व्यापारी मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, माझ्यासाठी इराणने अण्वस्त्रे न बनवणे ही सर्वात महत्त्वाची अट आहे आणि ते यावर सहमत झाले आहेत. मात्र त्यांचे हे दावे इराणने यापूर्वीच फेटाळले आहेत.

इराणने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही महत्त्वाच्या चर्चेपूर्वी अमेरिकेने त्यांचे गोठवलेले १२ अब्ज डॉलर्सचे अमेरिकन फंड मुक्त करावेत. युरेनियम नष्ट करण्याबाबत ट्रम्प यांनी केलेले वक्तव्य आधारहीन असल्याचे इराणचे म्हणणे आहे. याशिवाय इराणने या शांतता करारात लेबनॉनचाही समावेश करण्याचा आग्रह धरला आहे.

दुसरीकडे, अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी इशारा दिला आहे की, गरज पडल्यास अमेरिका पुन्हा लष्करी कारवाई करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. युद्धबंदीनंतर दोन्ही देशांमधील थेट हल्ले थांबले असले, तरी अधूनमधून हिंसक चकमकी सुरूच आहेत.

COMMENTS