Homeताज्या बातम्याअहमदनगर

रेहेकुरी वनक्षेत्रात काळविटाच्या शिकारीचा प्रयत्न

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील रेहेकुरी वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वनक्षेत्रातील गस्ती दरम्यान कारवाई केली आहे. रेहेकुरी हद्दीती

माजी मंत्री राम शिंदेंना मोठा झटका… भाजपचा बडा नेता गेला राष्ट्रवादीत
आणखी एक बडा सावकार कर्जत पोलिसांच्या जाळ्यात
उपसरपंच लहु शिराळे मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील रेहेकुरी वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वनक्षेत्रातील गस्ती दरम्यान कारवाई केली आहे. रेहेकुरी हद्दीतील बिटमध्ये गट नंबर १६१ / ड येथे काही शिकाऱ्यांनी मिळून काळविटांसाठी जाळे (वाघर) लावले होते. कर्मचाऱ्यांना गस्तीच्या दरम्यान हा प्रकार निदर्शनास आला. त्यावेळी शिकारी पळून गेले. मात्र त्यांच्याकडून शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनरक्षक अरुण साळवे व निलेश जाधव यांनी गस्तीदरम्यान केलेल्या कारवाईत एक दुचाकी, २ नायलॉनचे मोठे जाळे, कोयते आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. मेळघाट सायबर सेल वनविभाग यांच्या मदतीने आरोपीचे लोकेशन सापडले. परंतु तिथेही चलाखीने आरोपीने पळ काढला. कर्जत पोलिसांच्या मदतीने दुचाकीच्या माहितीवरुन ज्ञानेश्वर सुरेश काळे, रा. कुळधरण या आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळाले.

या आरोपीच्या बाकी साथीदारांचीही माहिती मिळाली असून सर्व रेहेकुरी व कुळधरण परिसरातील असून त्यांचा शोध सुरु आहे. अटक आरोपीला १४ सप्टेंबरपर्यंत वनकोठडी मिळाली आहे. इतर तपास सुरु आहे, ही कारवाई पुणे वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक रमेश कुमार यांच्या आदेशान्वये करण्यात आली. यासाठी पुणे वन्यजीवचे विभागीय वनअधिकारी डी.वाय. भुरके व सहाय्यक वनसंरक्षक डी.आर. वाकचौरे यांचे मार्गदर्शन लाभले. वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.

COMMENTS