राष्ट्रवादीचा मोठा निर्णय… ओबीसी आरक्षणाचा निर्णय न झाल्यास…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीचा मोठा निर्णय… ओबीसी आरक्षणाचा निर्णय न झाल्यास…

प्रतिनिधी : मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या आजी-माजी आमदारांची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथ

बुलडाण्यात टिप्पर उलटून 13 मजुरांचा मृत्यू l DAINIK LOKMNTHAN*
येत्या चार-पाच दिवसांत शाळा उघडण्याचा निर्णय होईल : राजेश टोपे l DAINIK LOKMNTHAN
जनतेचे प्राण वाचवण्याला प्राधान्य दिले हा संदेश जगाला देऊया : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रतिनिधी : मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या आजी-माजी आमदारांची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. या बैठकीला शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं.

यावेळी ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न मांडण्यात आला होता. त्यावर शरद पवारांनी मोठा निर्णय घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आरक्षणाचा तिढा सुटला नाही आणि न्यायालयाने निवडणुका घेण्याचे निर्देश दिले तर ओबीसी जागांवर ओबीसी उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाला पवारांनीही सहमती दिली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला लांबणीवर टाकता येत नाहीत. एखादा कायदा करून सर्व पक्षांना एकजूट करून, एकमत करून आरक्षण देता येते का हे बघावं लागेल.

ही सगळी परिस्थिती असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका सुप्रीम कोर्टात मांडलेली आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात असताना ते निवडणुका घेऊ शकतात, अशी भूमिका आयोगाने घेतली आहे.

सुप्रीम कोर्टाने आदेश दिला निवडणुका घेतल्या पाहिजेत. जर दुसरा पर्याय उरला नाही तर रिक्त झालेल्या ओबीसी जागांवर ओबीसी उमेदवार देण्याचा निर्णय पक्षाचा झाला आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.

तसेच जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये, अशी आमची भूमिका आहे. पण एखादा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यास पक्षाची ही भूमिका असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS