संगमनेर तालुक्यातील ११ शिक्षकांना पुरस्कार जाहीर

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

संगमनेर तालुक्यातील ११ शिक्षकांना पुरस्कार जाहीर

संगमनेर/प्रतिनिधीराष्ट्र बांधणीच्या कामात मोलाची साथ देणाऱ्या प्रयोगशिल शिक्षकांचा सन्मान केला जावा, त्यांना त्यांचे काम अधिक चांगल्या प्रकारे कर

पढेगाव ग्रामपंचायतकडून महिलांचा सन्मान
नगर अर्बन बँक निवडणुकीत राजकीय एन्ट्रीला सुरुवात
डॉ.अमोल बागुल यांना नीति आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार

संगमनेर/प्रतिनिधी
राष्ट्र बांधणीच्या कामात मोलाची साथ देणाऱ्या प्रयोगशिल शिक्षकांचा सन्मान केला जावा, त्यांना त्यांचे काम अधिक चांगल्या प्रकारे करता यावे यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून रोटरीतर्फे राष्ट्रबांधणीचे शिल्पकार हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी संगमनेर तालुक्यातील ११ शिक्षकांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांची घोषणा शिक्षक दिनाच्या दिवशी करण्यात आली असून रविवार दि. १२ सप्टेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण रोटरी नेत्र रुग्णालय येथील रोटरी हॉलमध्ये आयोजित करण्यात आले.

पुरस्कार देतांना शिक्षकांचे शैक्षणिक कार्य, समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान, मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षकांनी केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल घेण्यात आल्याची माहिती प्रकल्प प्रमुख नरेंद्र चांडक व सुनिल घुले यांनी दिली.

पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये कैलास केदु पवार (गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग, पंचायत समिती, संगमनेर), शैलजा पंढरीनाथ फटांगरे (मुख्याध्यापक, आनंदवन विद्यालय, घुलेवाडी), पांडूरंग देवगीर गोसावी (मुख्याध्यापक, जि.प.प्रा शाळा कौठे कमळेश्वर), दत्तु भिकाजी आव्हाड (उपाध्यापक, नगरपालिका शाळा क्र.१, संगमनेर), शायदा हसन शेख (उपाध्यापक, जि.प.प्रा.शाळा साकुर), उमेश रामनाथ काळे (उपाध्यापक, जि.प.प्रा. शाळा, कासारा दुमाला), स्वाती बबन भोर (उपाध्यापक, जि.प.प्रा. शाळा बोटा), संदिप सुधाकर पोखरकर (उपाध्यापक, जि.प.प्रा. शाळा, तळेगाव), प्रिती कारभारी खालकर (उपाध्यापक, जि.प.प्रा. शाळा रहिमपूर बंधारा), बाळासाहेब सुखदेव भागवत (जि.प.प्रा. शाळा, पिंपळगाव माथा), योगिता लक्ष्मण वडनेरे (जि.प.प्रा. शाळा गुंजाळमळा, निमज) आदिंचा समावेश आहे.

नवीन पिढी घडविण्यात महत्वाचा वाटा असलेले शिक्षकांचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे या भावनेतून हा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. कोविडचे सर्व नियम पाळून ठरावीक निमंत्रीतांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

COMMENTS