संगमनेर ( प्रतिनिधी ) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त भारतात साजरा होणाऱ्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातील आद
संगमनेर ( प्रतिनिधी )
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त भारतात साजरा होणाऱ्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षकांचा सन्मान केला जातो. या पवित्र दिवसाचे औचित्य साधून उपेक्षित असलेल्या दिव्यांग शिक्षकांचा आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सन्मान केला आहे.
जळगाव येथे गोदावरी हायस्कूल मध्ये शहरातील विविध दिव्यांग शिक्षकांचा सन्मान आमदार डॉ. तांबे यांनी केला. यावेळी शिक्षण अधिकारी बी.जे. पाटील, शैलेंद्र खडके, संजय बडगुजर, प्रवीण महाजन, सुशिल महाजन, सुनील गरुड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, शिक्षण हे समाज प्रबोधनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. यामध्ये अनेक दिवस आदर्शवत काम करणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या निमित्त आपण गौरव करत असतो .मात्र विशेष व्यक्ती असलेल्या अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या अंध शिक्षकांचाही तितकाच सन्मान आपण केला पाहीजे. समाजातील दिव्यांग, मूकबधिर अंध व्यक्तींना आपण काय आदराची वागणूक दिली पाहिजे.
या विद्यार्थ्यांसाठी काम करणारे दिव्यांग शिक्षकही समाजात आहेत. या सर्वांच्या प्रती आदर बाळगणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे म्हणून आज शिक्षक दिनानिमित्त या शिक्षकांचा होणारा गौरव हा आदर्शवत ठरणार आहे.तर शिक्षण अधिकारी बी.जे. पाटील म्हणाले की, आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिव्यांग शिक्षकांचा सन्मान करून एक नवी परंपरा जोपासली आहे.
तर शैलेंद्र खडके म्हणाले की, आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने विधानपरिषदेत आवाज उठवला असून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत आज अंध व दिव्यांग शिक्षकांचा सन्मान करुन अभिनव उपक्रम सुरू केला असल्याचे ते म्हणाले.
COMMENTS