Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाकळीत उडणार धुरळा! ‘रानोबा केसरी’ बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणारनागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – युवा नेते सुरज घुले

ग्रामीण संस्कृतीचा कणा व शौर्याचे प्रतीक असलेली बैलगाडा शर्यत ही केज तालुक्यातील  टाकळी ( नगरीत थरार निर्माण करण्यास सज्ज झाली आहे. ग्रामदैवत श्र

मिल्लीया महाविद्यालयात सेवा हक्क दिन उत्साहात साजरा
महावितरणमधील खांदेपालटगेवराईचे उपविभागीय अभियंता शाम मोरे यांची बदली
बीड जिल्ह्यातील कारखानदाराकडून ऊस उत्पादकावर संक्रात-दत्ता वाकसे



ग्रामीण संस्कृतीचा कणा व शौर्याचे प्रतीक असलेली बैलगाडा शर्यत ही केज तालुक्यातील  टाकळी ( नगरीत थरार निर्माण करण्यास सज्ज झाली आहे. ग्रामदैवत श्री. रानोबा यात्रेनिमित्त ’पर्व 4 थे’ अंतर्गत भव्य ’रानोबा केसरी’ ओपन बैलगाडा शर्यतीचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन भाजपाचे युवा नेते सुरज भैय्या घुले यांनी केले आहे.
सोमवार, 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8:30 वाजल्यापासून टाकळीच्या मैदानात हा ’नाद’ घुमणार आहे. बक्षिसांचा पाऊस: 41 हजारांसह मानाची ढाल! या स्पर्धेत विजेत्यांना एकूण सात क्रमांकापर्यंत भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत: प्रथम क्रमांक: 41,000 व 2 मानाच्या ढाली (सौजन्य: आ. नमिताताई अक्षय मुंदडा), द्वितीय क्रमांक: 31,000 व 2 मानाच्या ढाली (सौजन्य: सुरज रामकृष्ण घुले), तृतीय क्रमांक: 21,000 व 2 मानाच्या ढाली (सौजन्य: विष्णू जीवन राख), चौथी बक्षीस 15000 व 2 मानाच्या ढाली (सौजन्य युवा नेते श्रीकांत घुले) (याव्यतिरिक्त 7 व्या क्रमांकापर्यंत रोख बक्षिसे व ढालींचे वितरण केले जाईल.) आपली परंपरा आणि खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी सर्व बैलगाडा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. – सुरजभैया घुले युवा नेते, भाजपा. केज तालुक्यात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे टाकळी येथील ’रानोबा केसरी’ बैलगाडा शर्यतीची. श्री रानोबा यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ, टाकळी यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातील नामांकित बैलगाडे सहभागी होणार आहेत. अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेसाठी 799/- रुपये प्रवेश फी असून, बीड रोडपासून 500 मीटर अंतरावर असलेल्या टाकळी शिवरस्त्यावरील मैदानात ही स्पर्धा रंगणार आहे. या सोहळ्याला आमदार नमिताताई मुंदडा,युवा नेते सुरजभैया घुले, युवा नेते श्रीकांत घुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवणार आहेत.

COMMENTS