Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोले तालुका माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी मुंदडा, मंत्रीपदी राठी

अकोले : येथील तालुका माहेश्वरी सभेच्या सन २०२६ ते २०२९ च्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.  यामध्ये अध्यक्षपदी निरज मुंदडा तर मंत्री पदी प्रसाद

‘सकल ओबीसी समाज’ आणि ‘समता परिषदे’तर्फे गुणवंतांचा शाही सत्कार
महादेव कोळी समजातील जाधव भावकीचा आज स्नेह मेळावा
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा; अकोले दिव्यांग क्रांती संघटनेची मागणी

अकोले : येथील तालुका माहेश्वरी सभेच्या सन २०२६ ते २०२९ च्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.  यामध्ये अध्यक्षपदी निरज मुंदडा तर मंत्री पदी प्रसाद राठी यांची बिनविरोध निवड झाली.

 विठ्ठलदास भुतडा हे निवडणूक निर्णय अधिकारी होते. तर त्यांना निवर्तमान अध्यक्ष विजय सारडा व मंत्री विशाल राठी यांनी सहाय्य केले. बिनविरोध निवड झालेली कार्यकारणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष – निरज मुंदडा, मंत्री – प्रसाद राठी, उपाध्यक्ष – चेतन बुब, कोषाध्यक्ष – गौतम मुंदडा,  संघटन मंत्री – सर्वेश डांगरा, सह सचिव – अल्पेश सारडा, जिल्हा प्रतिनिधी – सोमनाथ मुंदडा व रामनिवास राठी,   पदेन – विजय सारडा व विशाल राठी, तर कार्यकारणी सदस्य सुरेशकुमार करवा यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अध्यक्ष निरज मुंदडा व त्यांचे सहकारी निश्चितच माहेश्वरी समाज बांधवांच्या विश्वासास पात्र असेच भरीव काम करतील असा विश्वासही प्रदेश जनसंपर्क मंत्री अजय जाजू यांनी व्यक्त केला. यावेळी विजय राठी, सतीश बुब, रमेशचंद्र सारडा, श्यामसुंदर मुंदडा, विजय राठी, शुभम मणियार, धनंजय जाजू, पंकज बुब, आनंद मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत निवर्तमान अध्यक्ष विजय सारडा यांनी केले, तर आभार निवर्तमान मंत्री विशाल राठी यांनी मानले.

COMMENTS