Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठीरितेश-जेनेलिया देशमुख ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’च्या जनजागृती उपक्रमाला अध

आरेत समृद्ध, प्रेरणादायी जंगल निर्माण करणार : मंत्री शेलार80 एकर जागेत 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ : मूल्यमापन समितीवर पत्रकार गोविंद टेकाळे यांची निवड
एसटी स्थानके व बसेसची दर चार तासांनी स्वच्छतापरिवहन मंत्री प्रताप सरनाईक : राज्यभर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ


मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’च्या जनजागृती उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नियुक्तीचा करार हस्तांतरण पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. एसटी महामंडळाच्या विविध जनजागृती मोहिमा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचाव्यात, तसेच परिवहन विभागाच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’ ची परिणामकारकता वाढविणे हा या नियुक्तीमागील प्रमुख उद्देश आहे. रस्ता सुरक्षा, प्रवासी जनजागृती आणि सामाजिक संदेशांच्या प्रसारासाठी या दोन्ही कलाकारांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

COMMENTS