दिल्लीतल्या शाळा पुन्हा गजबजणार

Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीतल्या शाळा पुन्हा गजबजणार

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, शाळा कधी सुरू होणार असा प्रश्‍न विचारण्यात येत आहे. मात्र दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शाळा गजबजणार

दुर्देवी ! 27 वर्षीय युवक गेला वाहून.
यंदा देशात होणार 103 टक्के पाऊस | DAINIK LOKMNTHAN
40 हजार पदांची जम्बो भरतीची घोषणा

नवी दिल्ली – देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, शाळा कधी सुरू होणार असा प्रश्‍न विचारण्यात येत आहे. मात्र दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शाळा गजबजणार असल्याचे दिसून येत आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए) सोमवारी सांगितले की, प्रत्येक वर्गात जास्तीत जास्त 50 टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार शाळांमध्ये बोलावले जाऊ शकते. डीडीएमएने म्हटले आहे की शाळांनी कोविड -19 नियमांचे पालन करून वर्ग खोल्यांच्या विद्यार्थी क्षमतेनुसार वेळापत्रक तयार केले पाहिजे. कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे विद्यार्थी, शिक्षक यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये येऊ दिले जाणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी, सकाळच्या सत्रात शाळेला आलेल्या विद्यार्थ्यांची शाळा सुटण्याची वेळ आणि दुपार किंवा संध्याकाळच्या दुसर्‍या सत्रातल्या विद्यार्थ्यांची शाळा भरण्याची वेळ यात किमान एक तासाचे अंतर असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी दुपारचे जेवण, पुस्तके, कागद आणि स्टेशनरी वस्तू एकमेकांसोबत शेअर करू नये अशा सूचनाही दिल्या आहेत.

COMMENTS