Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोग्य विभागातील मनमानी कारभार उघडकीस; तोंडी आदेशांवर काम करणार्‍यांवर चौकशीची तलवार

नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अनियमितता आणि मनमानी कारभाराचा मोठा पर्दाफाश होत असून, आता या प्रकरणात संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारव

गोदावरी महामंडळ कार्यालय स्थलांतराचा विखेंचा ‘बालहट्ट’खा. निलेश लंके ; निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ  
जनगणनेच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह?नागरिकांकडून माहिती लपविण्याचे प्रकार, प्रगणकांवर दबाव असल्याची चर्चा
टक्केवारीचे राजकारण की विकासाचा बाजार?जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीसाठी नांदेड शहरात चढाओढ; कार्यकर्त्यांमध्ये ‘ डव्हान्स बुकिंग’ची चर्चाजिल्हा नियोजन मंडळाच्या निधीचा बेलभंडारा जोरात चालू



नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अनियमितता आणि मनमानी कारभाराचा मोठा पर्दाफाश होत असून, आता या प्रकरणात संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आरोग्य विभागाची सखोल झाडाझडती करण्याचे आदेश दिले असून, नियमबाह्य पद्धतीने काम करणार्‍यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांच्या कार्यकाळात घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांमुळे विभागात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तोंडी आदेशांच्या आधारे अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. काही कर्मचार्‍यांकडे एकाच वेळी अनेक विभागांचा पदभार देण्यात आला, तर कार्यालयातील टेबल बदलण्यासारख्या बाबींमध्येही अनावश्यक हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी होत्या. विशेष म्हणजे, हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकार्‍याची जिल्हा परिषदेत नियमबाह्य प्रतिनियुक्ती करण्यात आली होती.  या अधिकार्‍यामार्फतच आरोग्य विभागातील आर्थिक व्यवहार आणि देयके अदा करण्याचे काम चालत असल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने केलेल्या दप्तर तपासणीत अनेक त्रुटी उघड झाल्या आहेत. पत्रव्यवहारातील नियमभंग, नोंदींचा अभाव आणि प्रक्रियात्मक चुका यामुळे अनेक अधिकारी-कर्मचार्‍यांवर चौकशीची कारवाई होण्याची शक्यता आहे. याशिवाय, चौकशीच्या नावाखाली काही कर्मचार्‍यांची लुबाडणूक झाल्याच्या आरोपांनीही प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. त्यामुळे आता या संपूर्ण कालावधीत झालेल्या सर्व निर्णयांची आणि नियुक्त्यांची छाननी होणार असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. आरोग्य विभागातील या कारभारामुळे त्रस्त झालेल्या अनेक कर्मचार्‍यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या चौकशीचा अहवाल आणि त्यावर होणारी कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS