Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्नल पुरोहित यांना वर्षभरात दुसर्‍यांदा प्रमोशन

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या कर्नल श्रीकांत पुरोहित यांची ब्रिगेडियर पदावर पदोन्नती होणार आहे. सशस्त्र बल न्यायाध

अप्रकाशित पुस्तकावरून वाद !
देशाची अखंडता अबाधित ठेवण्यात सैन्याचे अमूल्य योगदान
जम्मू-काश्मीरमध्ये अपघातात दहा जवांनाचा मृत्यू


मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या कर्नल श्रीकांत पुरोहित यांची ब्रिगेडियर पदावर पदोन्नती होणार आहे. सशस्त्र बल न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीकांत पुरोहित यांची गतवर्षी सप्टेंबर महिन्यातच कर्नलपदी बढती झाली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यांतच त्यांना पुन्हा एकदा पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे हे विशेष. कर्नल श्रीकांत पुरोहित हे 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एक आरोपी होते. या प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांचे लष्करी करिअर पूर्णतः ठप्प झाले होते.

COMMENTS