Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र झटके; दिल्ली परिसरासह अनेक राज्ये हादरली

नवी दिल्ली : उत्तर भारतात शुक्रवारी रात्री अचानक भूकंपाचे जोरदार झटके जाणवून नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्री साधारण 9

शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक : मुख्यमंत्री फडणवीस; नागपुरात ‘महाराष्ट्र ज्ञान सभा-2026’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
एअर इंडियाचे सीईओ विल्सन यांचा राजीनामा; अहमदाबाद अपघात अहवालानंतर नवा सीईओ देणार
प.बंगालमध्ये काँगे्रस नेते अधीर रंजन यांना धक्काबुक्की; केरळमध्येही शशी थरूर यांच्या ताफ्याला अडवून गोंधळ

नवी दिल्ली : उत्तर भारतात शुक्रवारी रात्री अचानक भूकंपाचे जोरदार झटके जाणवून नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्री साधारण 9 वाजून 42 मिनिटांनी आलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर मापन पद्धतीवर 5.9 इतकी नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेलगत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दिल्ली परिसर, चंदीगड, हिमाचल प्रदेश तसेच जम्मू-काश्मीरमधील अनेक भागांमध्ये हे धक्के स्पष्टपणे जाणवले. उंच इमारतींमध्ये राहणार्‍या नागरिकांना कंपन अधिक तीव्रतेने जाणवले. अनेकांनी घरे आणि कार्यालये सोडून तातडीने बाहेर धाव घेतली. काही ठिकाणी नागरिक मोकळ्या जागांमध्ये एकत्र जमल्याचे चित्र दिसून आले. जम्मू-काश्मीरमधील उधमपूर, पुंछ आणि काश्मीर खोर्‍यातील विविध भागांमध्येही काही सेकंदांपर्यंत जमिनीचे कंपन जाणवले. याशिवाय पाकिस्तानमधील इस्लामाबाद, पंजाब आणि पेशावर परिसरातही भूकंपाचे परिणाम जाणवले असल्याचे वृत्त आहे. सुदैवाने या घटनेत आतापर्यंत कोणतीही मोठी जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन अधिकार्‍यांनी केले आहे. भूकंपानंतर अनेक नागरिकांनी सामाजिक माध्यमांवर आपले अनुभव मांडले. काहींनी पंखे, दिवे आणि घरातील फर्निचर हलताना जाणवल्याचे सांगितले, तर काहींना अचानक कंपन जाणवल्यामुळे भीती वाटल्याचेही नमूद केले.

COMMENTS