Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. प्रीतम भी. गेडाम यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार; राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने गौरव

मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे व्यसनमुक्ती साठी पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळापासून भरीव कामगिरी करणार्‍या व्यक्ति विशेष व संस्थाना राष्ट्रपि

अक्षय घाणेची कर व्यवस्थापक पदावर निवड  
पाटसकर अशोक गायकवाड टोळीचा मुंबई सा.बां. वर दरोडा
‘ओम’ यांनी धर्मदाय आयुक्त पदाचे शिखर गाठावे-इंजी. अजिंक्य आनेराव

मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे व्यसनमुक्ती साठी पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळापासून भरीव कामगिरी करणार्‍या व्यक्ति विशेष व संस्थाना राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार द्वारे पुरस्कृत करुन त्यांचा अमूल्य कार्याचा गौरव करण्यात येतो. नुकताच हा पुरस्कार नागपूर शहरातील उच्चशिक्षित आणि प्रसिद्ध लेखक, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रमधारक डॉ. प्रीतम भी. गेडाम यांना मुंबईतील एका कार्यक्रमात लेखक गटात त्यांच्या व्यसनमुक्तीच्या अमूल्य समाजकार्याचा सन्मान करण्यासाठी शासनाचा हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, धनादेश, शॉल प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
डॉ. प्रीतम भीमराव गेडाम विद्यार्थी जीवनापासूनच व्यसनमुक्तीच्या कामाला लागले, वर्ष 2008 ला समाजकार्य विषयात स्नातकोत्तर पदवीचे शिक्षण घेताना ते शिक्षक डॉ. विनोद गजघाटे सरांच्या मार्गदर्शनात काम करण्यासाठी त्यांचा व्यसनमुक्ती केंद्राशी जुळले, डॉ. गेडाम यांनी लोकांना व्यसनावर मात करण्यास मदत करण्यासाठी हळूहळू पथनाट्ये, शिबिरे, समुपदेशन आणि मार्गदर्शन करायला सुरूवात केली. सोबत व्यसनाच्या समस्येवर लेखन करायला देखील सुरुवात केली. या शासकीय सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह विविध आमदार, अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS